दगडाने ठेचून तरुणाची हत्या
By Admin | Updated: May 24, 2016 01:25 IST2016-05-24T00:58:09+5:302016-05-24T01:25:25+5:30
औरंगाबाद : पत्नीला भेटण्यासाठी सासुरवाडीला जातो, असे सांगून रविवारी सकाळी घराबाहेर पडलेल्या तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे

दगडाने ठेचून तरुणाची हत्या
औरंगाबाद : पत्नीला भेटण्यासाठी सासुरवाडीला जातो, असे सांगून रविवारी सकाळी घराबाहेर पडलेल्या तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना बीड बायपास रोडवरील सहारा सिटी प्रकल्पासमोरील गट नंबर ६५२ मधील निर्जनस्थळी घडली. सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
दत्ता जनार्दन डिघुळे (३१,रा. अरिहंतनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याविषयी पोलिसांनी सांगितले की, दत्ता सहा महिन्यांपासून बेरोजगार होता. त्याची पत्नी देवपूळ (ता. कन्नड) येथे माहेरी गेलेली होती.
रविवारी सकाळी ८ वाजता तो सासुरवाडीला जाऊन पत्नीला भेटून येतो, असे सांगून घराबाहेर पडला होता. तो सासुरवाडीत मुक्कामी थांबला असेल, असे त्याच्या नातेवाईकांना वाटले. त्यामुळे त्यांनी त्याचा शोध घेतला नाही. दरम्यान बीड बायपास परिसरातील सहारा सिटी प्रकल्पासमोरील गट नंबर ६५२/२ मध्ये एका तरुणाचा मृतदेह बेवारस अवस्थेत पडलेला असल्याची माहिती परिसरातील गुराख्यांनी पोलिसांना कळविली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर, पोलीस उपनिरीक्षक मधुकर शिंदे, कर्मचारी जाधव, आंधळे, वाघ यांनी घटनास्थळी धाव घेतली. दत्ता यांची अत्यंत निर्दयीपणे हत्या केल्याचे दिसून आले. (पान २ वर)