शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

क्रूरकर्मा! हत्येनंतर आरोपींनी मृतदेहाला आंघोळ घातली, त्याचे कपडे बदलले; घाटी रुग्णालयात नेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 13:05 IST

चोरीच्या संशयावरून मनोजला सुरुवातीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. मात्र, तो दाद देत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी त्याचे हातपाय बांधून फावड्याच्या दांड्याने त्यास ठेचले.

औरंगाबाद : चोरीच्या संशयावरून मनोजची हत्या केल्यानंतर मारेकऱ्यांनी अत्यंत शांतपणे त्याच्या अंगावरील फाटलेले कपडे, रक्ताचे डाग पाहून डॉक्टरांना संशय येऊ नये, यासाठी त्याला स्नान घातले. त्याच्या अंगावरील रक्ताचे डाग पुसून शरीर स्वच्छ केले. एवढेच नव्हे तर त्यांनी त्याच्या अंगावरील फाटके कपडे काढून दुसरे कपडे घातल्याची माहिती पोलीस चाैकशीत समोर आली.

पोलीस सूत्राने सांगितले की, आरोपींना पकडल्यानंतर त्यांनी दिलेली माहिती धक्कादायक आहे. चोरीच्या संशयावरून मनोजला सुरुवातीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. मात्र, तो दाद देत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी त्याचे हातपाय बांधून फावड्याच्या दांड्याने त्यास ठेचले. हे करताना प्रत्येकाने त्याला दांड्याचे फटके दिले. मारहाणीत घायाळ झालेला मनोज चोरी केली नसल्याचे रडत सांगत होता. मात्र, निर्दयी आरोपींना त्याची दया आली नाही. कोणी दांड्याने तर कोणी लाथाबुक्क्यांनी सुमारे तासभर त्याला मारहाण केली. यात तो मरण पावल्याचे आरोपींच्या लक्षात आले. नंतर स्नान घालून, अंगावरील कपडे बदलून त्यास घाटीत नेले. घाटीतील डॉक्टरांना मनोज खासगी रुग्णालयाजवळ पडलेला होता, अशी खोटी माहिती देऊन बनवेगिरी केली.

तरुणाला मारहाण करताना देत होते घोषणामनोजला मारहाण करताना आरोपी ‘मांगीरबाबा की जय’ अशा घोषणा देत होते. त्यांच्यापैकी काही जण मनोजच्या डोक्याला आणि खांद्याला मारू नका, असे म्हणत होते.

नऊ महिन्यांपूर्वी झाली होती आकाश राजपूतची अशीच हत्यागतवर्षी ९ ऑगस्टला हनुमाननगर येथील चौकात तनपुरे गँगने आकाश राजपूत या तरुणाची पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केली होती. भर चौकात आरोपी आकाशची हत्या करीत होते. मात्र, गँगच्या दहशतीमुळे त्याच्या मदतीला कोणीही धावले नव्हते. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली. आरोपी अद्यापही जेलमध्ये आहेत. मनोजची हातपाय बांधून निर्दयीपणे हत्या झाल्याने शहरवासीयांना आकाशच्या हत्येची आठवण झाली. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू