वाण खरेदीसाठी महिलांची बाजारात गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:09 IST2021-01-13T04:09:27+5:302021-01-13T04:09:27+5:30
औरंगाबाद : एका दिवसावर संक्रांत सण येऊन ठेपल्याने महिलांनी वाण खरेदीसाठी मंगळवारी बाजरात गर्दी केली होती. विशेष म्हणजे ...

वाण खरेदीसाठी महिलांची बाजारात गर्दी
औरंगाबाद : एका दिवसावर संक्रांत सण येऊन ठेपल्याने महिलांनी वाण खरेदीसाठी मंगळवारी बाजरात गर्दी केली होती. विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझरच्या छोट्या बाटल्या, डिझायनर मास्क वाण म्हणून खरेदी करण्याकडे कल दिसून आला.
वर्षातील पहिला सण संक्रांत. हा महिलांचा सण तसेच ‘तिळगुळ घ्या, गोडगोड बोला' असा स्नेहाचा संदेश देणारा सण होय. खरेदीसाठी आज बाजारात महिलांची गर्दी उसळली होती. गुलमंडी, सुपारी हनुमान रोड, केळीबाजार, कुंभारवाडा, त्रिमूर्ती चौक,गजानन मंदिर ते पुंडलिकनगर, शिवाजीनगर टीव्ही सेंटर आदी बाजरात महिलांची गर्दी दिसून येत होती. कोणी वाण खरेदी करत होते. प्रत्येक महिला आवर्जुन सौभाग्यचे लेणे बांगड्या खरेदी करताना दिसून आल्या, तसेच भोगी (सर्वप्रकारच्या भाज्या, फळ) खरेदी करत होत्या. रेडिमेड काटेरी हलवा, चिक्की खरेदी केली जात होती. काही नोकरदार महिलांनी तर तिळगुळाचा रेडिमेड लाडूच्या ऑर्डरी दिल्याचे दुकानदारांनी सांगितले. वाण खरेदीसाठी महिलांनी भांडी बाजारात गर्दी केली असल्याचे दिसून आले. यंदा विशेष म्हणजे कोरोनामुळे मेडिकलच्या दुकानावरून सॅनिटायझरच्या डझनभर छोट्या बाटल्या खरेदी करत होत्या तर काही जणी व डिझायनर मास्क खरेदी करताना दिसून आल्या.
चौकट
७० हजार नारळ बाजारात
संक्रांतीला वाणात नारळ देण्याची प्रथा आहे. त्यामुळे मोंढ्यात तमिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यातून दररोज ७० हजारांपेक्षा अधिक नारळ विक्रीला आणले जात आहे. १५०० ते २२०० रुपये प्रतिक्विंटल नारळ विकले जात आहे.
चौकट
वाणची संख्या घटली
विक्रेत्यांनी सांगितले बाजारात गर्दी दिसत असली तरी. जिथे मागील वर्षीपर्यंत एक एक महिला ८ ते १० डझन वाण खरेदी करत असत त्या यंदा फक्त २ तर ३ डझन वाण खरेदी करताना दिसून आलाय. कोरोनामुळे किती महिला एकमेकींच्या घरी जातील, अशी शंका व्यक्त केली जात आहे.