शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या तिजोरीत खडखडाट; पाटबंधारे विभागाकडे भरण्यासाठी ५० लाख रुपयेही नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 11:24 IST

मागील अकरा महिन्यांमध्ये महानगरपालिकेने आऊटसोर्सिंगच्या नावावर केलेली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी आणि कोट्यवधी रुपयांच्या अनावश्यक विकासकामांचे परिणाम आता भोगावे लागत आहेत.

ठळक मुद्दे ऐन मार्च महिन्यात तिजोरीत खडखडाट असून, पाणीपुरवठा खंडित होऊ नये म्हणून पाटबंधारे विभागाकडे भरण्यासाठी ५० लाख रुपये नाहीत. ६ कोटी रुपयांचा अत्यावश्यक खर्च समोर आहे. ११० कोटी रुपयांच्या विकासकामांची बिले प्रलंबित आहेत.

औरंगाबाद : मागील अकरा महिन्यांमध्ये महानगरपालिकेने आऊटसोर्सिंगच्या नावावर केलेली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी आणि कोट्यवधी रुपयांच्या अनावश्यक विकासकामांचे परिणाम आता भोगावे लागत आहेत. ऐन मार्च महिन्यात तिजोरीत खडखडाट असून, पाणीपुरवठा खंडित होऊ नये म्हणून पाटबंधारे विभागाकडे भरण्यासाठी ५० लाख रुपये नाहीत. ६ कोटी रुपयांचा अत्यावश्यक खर्च समोर आहे. ११० कोटी रुपयांच्या विकासकामांची बिले प्रलंबित आहेत, अशी विदारक स्थिती आज स्थायी समितीच्या सभागृहात प्रभारी मुख्य लेखाधिकारी महावीर पाटणी यांनी मांडली.

ओम प्रकाश बकोरिया यांनी आपल्या १४ महिन्यांच्या कार्यकाळात महापालिकेला कमालीची आर्थिक शिस्त लावली होती. पुढे ही शिस्त काही दिवसांमध्येच मोडण्यात आली. लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांनी सुचविलेल्या कोट्यवधी रुपयांची कामे करण्यात आली. गरज नसताना कोट्यवधी रुपयांचे आऊटसोर्र्सिंग करण्यात आले. मार्चअखेरीस महापालिका डबघाईला निघाली आहे. महापालिकेचे खाते सध्या उणे २६ लाखांपर्यंत पोहोचले आहे. बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी नेहमीच्या पद्धतीने लेखाविभागावर तोंडसुख घेणे सुरू केले. वॉर्डातील विकासकामे ठप्प झाली आहेत. कंत्राटदारांची बिले त्वरित देण्यात यावीत. वसुली वाढविण्यात यावी, अशा सूचनांचा भडिमार सुरू केला. सभापती गजानन बारवाल यांनी प्रभारी मुख्य लेखाधिकारी महावीर पाटणी यांना खुलासा करण्याचे आदेश दिले.

पाटणी यांनी सादर केलेले आकडे पाहून अनेकांच्या पायाखालची वाळूच घसरली. शहराचा पाणीपुरवठा तोडू नये म्हणून आजच ५० लाख रुपये भरायचे आहेत. एवढीही रक्कम खात्यात नाही. ६ कोटींचा अत्यावश्यक खर्च समोर येऊन ठेपला आहे. यामध्ये डिझेल व इतर तत्सम बाबींचा समावेश आहे. शहरातील ११५ वॉर्डांमध्ये झालेल्या विकास कामांची मोठी बिले थकली आहेत. हा आकडा ११० कोटींचा आहे, अशा गंभीर परिस्थितीत काम कसे करावे, असा प्रश्न आहे. लेखा विभागाने सादर केलेल्या माहितीनंतर नगरसेवकांनी चक्क यू टर्न घेतला.

आर्थिक शिस्त लावावी कोणीमहापालिकेला आर्थिक शिस्त लावण्याचे काम आयुक्तांनी करायला हवे. बकोरिया यांच्यानंतर कोणत्याही आयुक्तांनी अशी शिस्त लावण्याचा साधा प्रयत्नही केला नाही. त्यामुळे आज महापालिका भीषण आर्थिक संकटात सापडली आहे. दरमहिन्याला शासनाकडून १४ ते १९ कोटी रुपये जीएसटीपोटी मिळत आहेत. त्यावर कर्मचार्‍यांचा पगार, अत्यावश्यक खर्च होत आहे.

आर्थिक शिस्त बिघडलीमहापालिकेच्या तिजोरीत जमा होणार्‍या रकमेपेक्षा चारपट खर्च वाढवून ठेवण्यात आला आहे. गरज नसताना कोट्यवधी रुपयांची विकासकामे वॉर्डांमध्ये करण्यात येत आहेत. अधिकार्‍यांना नाही, म्हणण्याची सवय नाही. नगरसेवकांनी अर्थसंकल्पात काम सुचविले म्हणून ते करण्याचा सपाटा अधिकार्‍यांनी लावला आहे.

८० कोटींची बिले अजून बाकीमागील एक महिन्यापासून महापालिका आयुक्तांनी विविध विकासकामांच्या बिलांवर सह्या केलेल्या नाहीत. त्यामुळे आयुक्तांसह विविध कार्यकारी अभियंत्यांकडे किमान ८० कोटींची बिले पडून आहेत. ३१ मार्चपूर्वी ही सर्व बिले लेखा विभागात कशी दाखल होतील, यादृष्टीने राजकीय मंडळींनी जोर लावण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीJayakwadi Damजायकवाडी धरणMONEYपैसाTaxकर