शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अस्तित्वात नसलेल्या योजनेचे अर्ज भरण्यासाठी झुंबड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 14:34 IST

दोन लाख रुपये अनुदान दिले जाणार असल्याची अफवा

ठळक मुद्देदहा हजारापेक्षा अधिक बोगस अर्जांची विक्रीटपाल कार्यालयासमोर अर्ज पाठविण्यासाठी गर्दी

- मोबीन खान 

वैजापूर (औरंगाबाद ) : ‘बेटी बचाव-बेटी पढाओ’ योजनेत ग्राहक नोंदणी अर्ज भरण्यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायत, शाळा, टपाल कार्यालयात दररोज पालकांची झुंबड उडत आहे. या योजनेतून दोन लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे, असे सांगून सर्वसामान्य पालकांची लूट करण्यात येत आहे. आश्चर्य, म्हणजे अशी कोणतीही योजना अस्तित्वात नसल्याचा खुलासा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला असतानाही आतापर्यंत दहा हजारांपेक्षा अधिक अर्ज तालुक्यात विक्री झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कथित योजनेचा ग्राहक नोंदणी अर्ज भरण्यासाठी तालुक्यातील शाळा, ग्रामपंचायत अणि टपाल कार्यालयात पालक मोठी गर्दी करीत आहेत. तालुक्यात ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या योजनेच्या नावावर दहा हजारापेक्षा अधिक बोगस अर्जांची विक्री झाली आहे.

तालुक्यातील अनेक झेरॉक्स सेंटरवर फॉर्म विक्री होत असून, त्यासाठी लागणारी इतर कागदपत्रेही झेरॉक्स करून देण्यात येत आहेत. हा फॉर्म टपालाद्वारे पाठविण्यासाठी एका व्यक्तीला जवळपास शंभर ते दीडशे रुपयांचा खर्च येत आहे. या अर्जामध्ये विविध माहिती मागण्यात आलेली असून, त्यामध्ये अर्जदाराची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, तसेच बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक इत्यादी माहिती मागविण्यात आली आहे. या योजनेंतर्गत मुलीला २ लाख रुपये मिळणार असल्याचाही उल्लेख केला आहे. अर्जासोबत असलेल्या पाकिटावर भारतसरकार, महिला एवं बालविकास मंत्रालय, शांतिभवन, नवी दिल्ली असा पत्ता छापण्यात आलेला आहे. योजनांच्या माहिती अभावी सर्वसामान्यांची लूट कशी होते, याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ‘प्रधानमंत्री बेटी बचाओ बेटी पढाओ योजना’ या योजनेच्या नावावर सर्वसामान्य जनतेची होणारी लूट प्रशासनाने  चौकशी करून तात्काळ थांबवावी, योजनेबाबत योग्य माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी, अशी मागणी तालुक्यातून होत आहे.

टपाल कार्यालयासमोर अर्ज पाठविण्यासाठी गर्दीया योजनेतून दोन लाख रुपये थेट अनुदान मिळणार असल्याची अफवा पसरविण्यात आली आहे. दरम्यान, कें द्र सरकारची अशी योजना नसल्याचे प्रशासनाने जाहीर केले; परंतु ग्रामीण भागात या योजनेंतर्गत विद्यार्थिनींसाठी दोन लाख रुपयांचा थेट लाभ मिळणार असल्याची बातमी पसरताच विविध गावांतून विद्यार्थिनी व महिला टपाल कार्यालयासमोर अर्ज पाठविण्यासाठी गर्दी करीत असून, प्रत्येक जण आपला अर्ज भरण्यासाठी धडपडत आहे.

१) सदरील नोंदणी फॉर्मची आम्हाला काहीच माहिती नसून शासनाकडून असे काहीच परिपत्रक आमच्या कार्यालयात आलेले नाही. त्यामुळे पालकांनी असे फॉर्म भरू नयेत.  -मनीष दिवेकर, गटशिक्षणाधिकारी.

 २) मुलींना दोन लाख रुपये मिळणार म्हणून मुली अणि पालक दररोज शाळेत बोनाफाईड मिळवण्यासाठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे शिक्षकांचा व पालकांचाही वेळ वाया जात आहे.  -मनोज सोनवणे, शिक्षक 

 ३) ही योजना दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार अणि उत्तराखंडमध्ये लागू आहे. महाराष्ट्रात अशी कोणतीही योजना लागू नाही, त्यामुळे पालकांनी असे फॉर्म भरू नयेत. तालुक्यात ज्या झेरॉक्स सेंटरवर असे फॉर्म विक्री होत आहेत त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल.  -डॉ. संदीपान सानप, उपविभागीय अधिकारी

 ४) दररोज हजारो फॉर्म ‘बेटी बचाओ-बेटी पढओ’चे टपाल कार्यालयातून दिल्लीला पाठविले जात आहेत. -बी. के. शेखरे, पोस्ट मास्टर, वैजापूर

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPost Officeपोस्ट ऑफिसStudentविद्यार्थीCentral Governmentकेंद्र सरकार