रुग्ण नातेवाइकांची रेमडेसिविर इंजेक्शनसाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:05 IST2021-04-27T04:05:31+5:302021-04-27T04:05:31+5:30
हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट उभारण्याची तयारी औरंगाबाद : शासकीय रुग्णालयांमध्ये हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे प्लांट उभे केले जाणार असून, त्यासाठी ...

रुग्ण नातेवाइकांची रेमडेसिविर इंजेक्शनसाठी गर्दी
हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट उभारण्याची तयारी
औरंगाबाद : शासकीय रुग्णालयांमध्ये हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे प्लांट उभे केले जाणार असून, त्यासाठी सीएसआर फंडचा वापर केला जाणार आहे. घाटी, मिनी घाटीसह चार तालुक्यांमध्ये आठवड्याभरात काम सुरू होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी दिली. गंगापूर, वैजापूर, कन्नड आणि सोयगाव या तालुक्यांतील उपजिल्हा रुग्णालय परिसरात देखील एक छोटा प्लांट उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कामाला येत्या काही दिवसांत सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातून इतर ठिकाणी ऑक्सिजन सिलिंडर पुरविण्यात येत आहेत. दोन दिवसांपूर्वी हिंगोली जिल्ह्याला सातशे सिलिंडर देण्यात आले. हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा छोटा प्लांट उभारण्यासाठी किमान ५० लाखांपर्यंत खर्च येतो. घाटी, मिनी घाटीत जे प्लांट उभारले जाणार आहेत. त्यावर किमान दीड ते दोन कोटींपर्यंत खर्चाची शक्यता आहे.