परभणीत खरेदीसाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:04 IST2017-08-21T00:04:33+5:302017-08-21T00:04:33+5:30
पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर विविध साहित्य खरेदीसाठी शेतकºयांनी रविवारी शहरातील मोंढा बाजारपेठेत गर्दी केली होती़

परभणीत खरेदीसाठी गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर विविध साहित्य खरेदीसाठी शेतकºयांनी रविवारी शहरातील मोंढा बाजारपेठेत गर्दी केली होती़
मागील काही दिवसांपासून पाऊस नसल्याने पोळा सणावर दुष्काळाचे सावट पसरले होते़ त्यामुळे या सणाची तयारी उशिराने सुरू करण्यात आली़ त्यातच शनिवारपासून पाऊस सुरू झाल्याने शेतकºयांचा उत्साह दुणावला आहे़ बैलांची पूजा करून हा सण साजरा केला जातो़ या सणाच्या निमित्ताने बैलांची सजावट करून त्यांना गोडधोड खाण्यासाठी दिले जाते़ शेतकºयांसाठी हा महत्त्वाचा सण मानला जातो़
दरम्यान, पोळ्याच्या तयारीसाठी रविवारी बाजारपेठेत शेतकºयांची गर्दी झाल्याचे दिसून आले़ तालुक्यातील ग्रामीण भागातून अनेक शेतकरी खरेदीसाठी भर पावसात दाखल झाले होते़ बैलांना सजविण्यासाठी लागणारी झूल, घागरमाळ, बाशिंग, कासरा, वेसण या साहित्याचीही खरेदी झाली़
पूजेसाठी लागणाºया नारळ, शेंदूर, या वस्तूंना मागणी होती़ दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे ओढ्या, नाल्यांना पाणी आले असून, अनेक शेतकºयांनी ओढ्यावर जाऊन बैल धुतले़ एकंदर पावसामुळे शेतकºयांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, यंदा जिल्ह्यात पोळ्याचा सण थाटात साजरा केला जाणार आहे़