भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी खुलताबादेत वाढली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:50 IST2017-08-06T00:50:59+5:302017-08-06T00:50:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खुलताबाद : येथील भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी श्रावणाच्या दुसºया शनिवारी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. गर्दीमुळे ...

भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी खुलताबादेत वाढली गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
खुलताबाद : येथील भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी श्रावणाच्या दुसºया शनिवारी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. गर्दीमुळे खुलताबाद शहर हनुमानभक्तांनी गजबजले होते.
शुक्रवारी सायंकाळपासूनच धुळे, नाशिक, नगर व औरंगाबाद जिल्ह्यातून पायी दिंड्या, पालख्या दाखल होत होत्या. शुक्रवारी रात्री औरंगाबाद शहर व जिल्ह्यातून पायी येणाºया भाविकांची वर्दळ सुरू झाली. रात्री पायी येणारे भाविक हे लाखोंच्या संख्येने असल्याने औरंगाबाद - खुलताबाद, कन्नड - खुलताबाद, फुलंब्री - खुलताबाद, कसाबखेडा फाटा मार्गावर ठिकठिकाणी चहा, पाणी, फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. रात्रीपासूनच खुलताबाद शहरात जय भद्राचा जयघोष सुरू झाला होता. सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी झाल्याने दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. मंदिर परिसरात महाप्रसाद, साबुदाना खिचडी, चहापाणी, फराळाची व्यवस्था अनेक भाविकांनी केली होती.
श्रावण महिन्यातील दर शनिवारी भद्रा मारूतीची आकर्षक सजावट औरंगाबाद येथील जयसुख पटेल, नीलेश देशमुख, संजय.काळे, वल्लभ लढ्ढा, कृष्णा भुतडा हे करत असतात. श्रावणाच्या दुसºया शनिवारी अहमदाबाद येथून मारूतीसाठी मुकुट, बक्तर, पितांबर आणून त्याने मूर्तीस आकर्षकरित्या सजविण्यात आले होते. पोलिसांनी रात्रीपासून बंदोबस्त तैनात केला होता. पोलीस निरीक्षक हरीष खेडकर व त्यांचे कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. भाविकांचे सुरळीत दर्शन व्हावे म्हणून भद्रा मारूती संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू पाटील बारगळ, सचिव कचरू पाटील बारगळ, सुरक्षा अधिकारी राजेंद्र जोधंळे व त्यांचे सहकारी परिश्रम घेत होते. अनेकांनी कुटुंबियासोबत देवदर्शन व पर्यटनाचा आनंद घेतला. दौलताबाद, खुलताबाद, वेरूळ, म्हैसमाळ आदी पर्यटनस्थळे गर्दीने फुलून गेली होती.