शनी अमावस्येनिमित्त भाविकांची गर्दी
By Admin | Updated: July 27, 2014 01:17 IST2014-07-26T23:35:38+5:302014-07-27T01:17:14+5:30
केंद्रा बु. : सेनगाव तालुक्यातील वरखेडा येथे शनी अमावस्येनिमित्त पंचक्रोशीतील भाविकांनी वरखेडा येथे दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
शनी अमावस्येनिमित्त भाविकांची गर्दी
केंद्रा बु. : सेनगाव तालुक्यातील वरखेडा येथे शनी अमावस्येनिमित्त पंचक्रोशीतील भाविकांनी वरखेडा येथे दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पाऊस पडावा म्हणून काही भाविकांनी मारोतीच्या मूर्तीस जलाभिषेक केला.
वरखेडा येथील जागृत देवस्थान म्हणून तेलाचा मारोती परिसरात प्रसिद्ध असून, शनी आमावस्येनिमित्त गोरेगाव, हराळ, कहाकर, वाघजाळी, म्हाळशी, शेगाव खोडके, खैरखेडा, वलाना, मन्नास पिंपरी, बटवाडी, ताकतोडा, जामठी बु., गोंधनखेडा येथील भाविकांनी सकाळी ६ वाजतापासून गर्दी केली होती.
हनुमान मंदिर संस्थानकडून विशेष व्यवस्था करण्यात आली होती. तसेच भाविकांना दर्शन व्यवस्थित घेता यावे, यासाठी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. यावेळी चहापाण्याची व्यवस्था संजय देशमुख, रामेश्वर महाराज यांच्याकडून करण्यात आली होती. माधवराव सावंत यांच्यासह अनेक भाविकांनी तेलाच्या मारोतीला जलाभिषेक व महापूजा करून पावसासाठी साकडे घातले. (वार्ताहर)