‘संकष्ट चतुर्थी’निमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी
By Admin | Updated: August 22, 2016 01:19 IST2016-08-22T01:09:43+5:302016-08-22T01:19:09+5:30
लातूर : श्रावण महिन्यात देवाची पूजा व्रत करण्याची मोठी परंपरा आहे़ त्यातच श्रावण संकष्ट चतुर्थीला विशेष महत्व असून, रविवारी संकष्ट चतुर्थीनिमित्त लातूर

‘संकष्ट चतुर्थी’निमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी
लातूर : श्रावण महिन्यात देवाची पूजा व्रत करण्याची मोठी परंपरा आहे़ त्यातच श्रावण संकष्ट चतुर्थीला विशेष महत्व असून, रविवारी संकष्ट चतुर्थीनिमित्त लातूर शहरातील अष्टविनायक मंदिरात भाविकांची दर्शनासाठी दिवसभर गर्दी होती़ याशिवाय, सकाळी अभिषेक झाल्यानंतर मानिनी महिला मंडळाच्या वतीने अथर्वशीर्ष पठण करण्यात आले़
श्रावण महिन्यात पौर्णिमेला आणि संकष्ट चतुर्थीला विशेष महत्व आहे़ कालमापनातील पौर्णिमेनंतर येणाऱ्या चौथ्या दिवसाला संकष्ट चतुर्थी म्हणतात़ रविवारी यानिमित्ताने लातूर शहरातील अष्टविनायक मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते़ सकाळी ६ ते ८ यावेळेत ‘श्रीं’चा महाभिषेक करण्यात आला़ यानंतर सायंकाळी ५ ते ७ यावेळेत मानिनी महिला मंडळाच्या वतीने अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम घेण्यात आला़ दिवसभर भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलले होते़ महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती़
अभिषेक करण्यासाठी मंदिरात विशेष व्यवस्था करण्यात आली होती़ मंदिर समितीच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले़ हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला़ यावेळी मंदिर व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष रामविलास लोया, अष्टविनायक प्रतिष्ठानचे सचिव सुरेंद्र पाठक, संचालक अभय शहा, मंदिर व्यवस्थापक स्वामी, सचिन निलावार, प्रकाश पवार, गणेश हेड्डा आदींची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)