शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

मराठवाडा, विदर्भात शेती अन् पिकेही पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 08:56 IST

अनेक गावांचा संपर्क तुटला; सोयाबीन, तूर, कपाशीचे मोठे नुकसान

ठळक मुद्देअकोला, बुलडाणा व वाशिम या तिन्ही जिल्ह्यांत पावसाने कहर केला आहे. यवतमाळ, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील १३ तालुक्यांत मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत अतिवृष्टी झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद/नागपूर : विदर्भ आणि मराठवाड्यात सलग सुरू असलेल्या जोरदार पावसाने नदी-नाल्यांना पूर आले आहेत. शेतजमिनीत पाणी शिरल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सोयाबीन, तूर आदी पिके पाण्यात गेली आहेत, तर उडीद, मुगाची काढणी अडचणीत आली आहे. मराठवाड्यात सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने नदी-नाल्यांना पूर आले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. बीड जिल्ह्याला तिसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने झोडपले. गेवराई तालुक्यातील राजापूरचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. जालना, औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यातही दमदार पाऊस झाला. लातूर जिल्ह्यात मांजरा व तेरणा नदीवरील बंधारे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील २० मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून, चार दिवसांत पुराच्या पाण्याने तिघांचा बळी घेतला आहे. परभणी जिल्ह्यात गोदावरी, पूर्णा, दुधना या नद्यांसह ओढ्यांना पूर आला असून, पालम-गंगाखेड, गंगाखेड-परभणी, ताडकळस-पालम इ. प्रमुख मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. 

अकोला, बुलडाणा व वाशिम या तिन्ही जिल्ह्यांत पावसाने कहर केला आहे. यवतमाळ, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील १३ तालुक्यांत मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत अतिवृष्टी झाली.  वर्धा जिल्ह्यातील तीन तालुक्यांत अतिवृष्टी झाली. निम्न वर्धा प्रकल्पाचे ३१, तर बोर धरण प्रकल्पाचे सात दरवाजे उघडण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र तीन दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. जळगाव जिल्ह्यात वाघूर व हतनूर धरणात पाण्याची आवक सुरू आहे. धरणांच्या पातळीत वाढ होत आहे. हतनूर धरणाचे १४ दरवाजे पूर्णपणे उघडले व वाघूर धरणाचेही दरवाजे उघडावे लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसCrop Loanपीक कर्ज