शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
4
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
5
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
6
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
7
खुशखबर! थिएटरनंतर आता OTTवर दाखल होतोय 'धुरंधर', जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार?
8
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
9
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
10
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
11
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
12
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
14
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
15
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
16
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
17
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
18
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
19
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
Daily Top 2Weekly Top 5

पिके गेली, मदतही नाही; सरकारचा आश्वासनांचा बार फुसका निघाल्याने शेतकरी हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 18:38 IST

घोषित केलेले पॅकेज कागदावरच असल्याने शेतकरी हवालदिल

- जयेश निरपळगंगापूर : तालुक्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतीत होत्याचे नव्हते केले. हातातोंडाशी आलेल्या कापूस, मका, तूर, सोयाबीन व फळपिके आदीसह ७५ हजार हेक्टरवरील पिके पूर्णपणे नष्ट झाली. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल, अशी आश्वासन देण्यात आले होते; मात्र दिवाळी उलटून दहा दिवस झाले तरीदेखील तालुक्यातील एकाही नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा झाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पाहायला मिळत आहे.

सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे गंगापूर तालुक्यातील ७५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, ७८ हजार ५४० शेतकऱ्यांना नुकसानभरपाईसाठी ६५ कोटी रुपयांची गरज असल्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला होता. राज्य शासनाने राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जम्बो पॅकेजदेखील जाहीर केले होते. तसेच सदरील नुकसानभरपाईची रक्कम दिवाळीपूर्वी सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळेल, असे आश्वासनही दिले होते. यानुसार जिरायती पिकांसाठी ८ हजार ५०० रुपये प्रति हेक्टरनुसार तर बागायती पिकासाठी १७ हजार रुपये व फळपिकांसाठी २२ हजार ५०० रुपये प्रति हेक्टरप्रमाणे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार होती. त्यामुळे या पॅकेजकडे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. दिवाळीपूर्वीच मदतीची रक्कम खात्यात जमा होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती; परंतु, दिवाळीच्या दहा दिवसांनंतरही तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळालेली नाही. त्यातच आता पुन्हा परतीच्या पावसाने धुमाकूळ घालायला सुरुवात केल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

शासन निर्णयानंतर निधी वितरणप्रस्तावाद्वारे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाकडे निधीची मागणी केली आहे. शासन निर्णय प्राप्त होताच निधी वितरण सुरू करण्यात येईल.- नवनाथ वगवाड, तहसीलदार, गंगापूर

शेतकरी आर्थिक संकटातपिके गेल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. दिवाळी अंधारात गेल्याने घरामध्ये आनंद नाही आणि खिशात पैसा नाही. मंजूर झालेले अनुदानही वेळेवर न मिळाल्याने व त्यात परतीच्या पावसाचा मुक्काम वाढल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे.- अनंता भडके, शेतकरी, वाहेगाव

निकषांमध्ये बदल करावाशासनाने त्वरित उर्वरित अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे. तसेच निकषांमध्ये बदल करून वाढीव मदत द्यावी. सरकारने या प्रश्नाकडे संवेदनशीलतेने लक्ष द्यावे.- शामेर शेख, शेतकरी, ढोरेगाव

 

English
हिंदी सारांश
Web Title : Crops Lost, No Aid: Farmers Despondent as Promises Fail

Web Summary : Gangapur farmers face despair as promised Diwali aid for crop loss remains unfulfilled. 75,000 hectares of crops were destroyed. Unseasonal rains worsen the crisis.
टॅग्स :Rainपाऊसchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरFarmerशेतकरी