विद्युत पुरवठ्याअभावी पिके धोक्यात
By | Updated: December 4, 2020 04:08 IST2020-12-04T04:08:03+5:302020-12-04T04:08:03+5:30
यंदाच्या वर्षी तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. अतिवृष्टीमुळे खरिपाची पिके वाया गेली असून, आता रबी हंगामातील पिकांवर शेतकऱ्यांची भिस्त ...

विद्युत पुरवठ्याअभावी पिके धोक्यात
यंदाच्या वर्षी तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. अतिवृष्टीमुळे खरिपाची पिके वाया गेली असून, आता रबी हंगामातील पिकांवर शेतकऱ्यांची भिस्त आहे. मात्र, टाकळी राजेरायसह लामणगाव, अब्दुलपूर तांडा, जमालवाडी तांडा परिसरात विद्युत पुरवठा सुरळीत नाही. वीज टिकत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले असून, पिकेही पाण्याअभावी सुकून चालली आहेत. दररोज किमान आठ तास विद्युत पुरवठा सुरळीत करा अन्यथा महावितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा शेतकरी राजू भागडे, मनोज सपकाळ, इम्रान पटेल, अहेमद पटेल यांनी सहायक अभियंता यू. बी. खान यांना निवेदनाद्वारे दिला आहे.