७७५ कोटींचे पीककर्ज वाटप

By Admin | Updated: July 29, 2014 01:11 IST2014-07-29T00:41:49+5:302014-07-29T01:11:57+5:30

नांदेड : खरीप हंगामातील पिकांसाठी २५ जुलैपर्यंत जिल्ह्यातील विविध बँकांतर्फे १ लाख ४४ हजार ७३१ सभासदांना ७७५ कोटी ३८ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.

Crop Coverage of 775 Crore | ७७५ कोटींचे पीककर्ज वाटप

७७५ कोटींचे पीककर्ज वाटप

नांदेड : खरीप हंगामातील पिकांसाठी २५ जुलैपर्यंत जिल्ह्यातील विविध बँकांतर्फे १ लाख ४४ हजार ७३१ सभासदांना ७७५ कोटी ३८ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. उर्वरित कर्जवाटपाची प्रक्रिया सुरु असल्याचे जिल्हा निबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले.
रबी हंगामासाठी १९१ कोटी ४५ लाख तर खरीप हंगामासाठी १०८४ कोटी ९३ लाख असे एकूण १२७६ कोटी ३९ लाखांचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. बँकनिहाय कर्जवाटप असे- एसबीआय ९३ कोटी ५९ लाख, ६९.२८ टक्के, एसबीएच २१५ कोटी ६ लाख, ७१.६१ टक्के, बँक आॅफ महाराष्ट्र ३७ कोटी ६० लाख, ६८. ३६ टक्के, देना बँक ४८ कोटी ८८ लाख, ८९.८९ टक्के, आयडीबीआय १३.२६ कोटी , ४०.४७ टक्के, सीबीआय ७ कोटी ७० लाख ३३.९० टक्के, पीएनबी ३.५६ कोटी ३०.२४ टक्के, अलाहाबाद १.१ कोटी, १८.२८ टक्के, बीओआय १४.७६ कोटी ३०.०४ टक्के, बीओबी ५.७९ कोटी ५०.५० टक्के, सिंडीकेट ११ लाख, २.४५ टक्के, एसबीपी २.८२ कोटी, ६८.५५ टक्के, आयसीआयसीआय १.२५ कोटी, १४.४७ टक्के, युबीआय १४.२७ कोटी ६३.११ टक्के, विजया बँक १८ लाख, ३.४३ टक्के, आयएनजी निरंक, कॅनरा १.२२ कोटी, १६.२१ टक्के, पीअ‍ॅन्ड एस २२ लाख, ४.२० टक्के, आंध्रा बँक ८३ लाख, १९.४७ टक्के, अ‍ॅक्सिस १.९१ कोटी १२.४७ टक्के, कॉरपोरा १.४० कोटी २५.१८ टक्के, ओरिएन्टल ५५ लाख, ९.३२ टक्के, एचडीएफसी ३.७६ कोटी ३६.२६ टक्के, आयओबी ४८ लाख, १०.६८ टक्के, युको १.१९ कोटी ९०.८८ टक्के, डीसीबी ०, के.वैश्य १९ लाख,२१.३३ टक्के़
याप्रमाणे राष्ट्रीयीकृत बँकांनी ४८२०९ सभासदांना ४७१.५९ कोटी तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेने २६६०६ सभासदांना १५४.१५ कोटी तर एनडीसीसी बँकेने ६९९१६ सभासदांना १४९ कोटी ६३ लाख असे एकूण १ लाख ४४७३१ सभासदांना ७७५ कोटी ३८ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे़(प्रतिनिधी)

Web Title: Crop Coverage of 775 Crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.