गंभीर कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:02 IST2021-05-19T04:02:16+5:302021-05-19T04:02:16+5:30

सागर बेलकर सोमवारी सांयकाळी ६ वाजेच्या सुमारास कंपनीत काम करताना सिमेंटच्या पत्र्यावर पाय पडल्याने तो गंभीर जखमी झाला होता. ...

Critical worker dies during treatment | गंभीर कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

गंभीर कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

सागर बेलकर सोमवारी सांयकाळी ६ वाजेच्या सुमारास कंपनीत काम करताना सिमेंटच्या पत्र्यावर पाय पडल्याने तो गंभीर जखमी झाला होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सागरला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान, रात्री ११ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

----------------------------

सिडको वाळूज महानगरातून महिला बेपत्ता

वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातून २९ वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या चुलतीने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दिली आहे. सोनम दद्दु उईके ही चुलती बबली उईकेसोबत सिडको वाळूज महानगरात वास्तव्यास आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास सोनम घरातून बेपत्ता झाली आहे. सर्वत्र शोध घेऊनही ती न सापडल्याने बबली उईके हिने पुतणी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.

फोटो क्रमांक- सोनम उईके (बेपत्ता)

-------------------------

बजाजनगरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

वाळूज महानगर : हॉल तिकीट आणण्यासाठी महाविद्यालयात जाते, असे म्हणून घराबाहेर पडलेल्या एका अल्पवयीने मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. बजाजनगरातील ही अल्पवयीन मुलगी १६ मे रोजी महाविद्यालयातून हॉल तिकीट घेऊन येते, असे म्हणून घराबाहेर पडली होती. मात्र ती घरी न परतल्याने तिच्या वडिलांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

-----------------------

सिडकोतील पाणीपुरवठा सुरळीत करा

वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरात सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. सिडको प्रशासनाच्या वतीने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक तयार केले आहे. मात्र वेळापत्रकाप्रमाणे पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी पाठपुरावा करूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची ओरड अशोक डोमाटे, संदीप हाके, भाऊसाहेब पाटील आदींकडून होत आहे.

--------------------------

कृष्णानगरात स्वच्छतेकडे दुर्लक्ष

वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथील कृष्णानगरात स्वच्छतेकडे ग्रामपंचायतीचे कर्मचारी लक्ष देत नसल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या कामगार वसाहतीत नागरिक रस्त्याच्याकडेला व मोकळ्या जागेवर केर-कचरा आणून टाकत असल्याने सर्वत्र अस्वच्छता पसरत आहे. या केर-कचऱ्यामुळे मोकाट जनावरांना वसाहतीत संचार वाढला आहे. उघड्यावर केर-कचरा टाकणाऱ्याविरुद्ध ग्रामपंचायत कारवाई करीत नसल्याने नागरिकांत नाराजीचा सूर उमटत आहे.

Web Title: Critical worker dies during treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.