अधिकाराचा पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:18 IST2017-08-07T00:18:22+5:302017-08-07T00:18:22+5:30

आंतरजिल्हा बदलीने आलेल्या काही शिक्षकांना पदस्थापना बदलून देण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी एका पत्राद्वारे जि.प. शिक्षण विभागाला दिले आहेत

 Criterion of authority | अधिकाराचा पेच

अधिकाराचा पेच

विजय सरवदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : आंतरजिल्हा बदलीने आलेल्या काही शिक्षकांना पदस्थापना बदलून देण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी एका पत्राद्वारे जि.प. शिक्षण विभागाला दिले आहेत. तथापि, यासंदर्भात ग्रामविकास विभागाच्या सचिवांना अगोदर विचारावे लागेल, अशी भूमिका ‘सीईओ’ आर्दड यांनी घेतल्यामुळे शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचाºयांची पाचावर धारण बसली आहे.
आंतरजिल्हा बदलीने आलेल्या जवळपास २५९ शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड यांनी १८ जुलै रोजी समुपदेशन पद्धतीद्वारे पदस्थापना दिली; मात्र दूरच्या तालुक्यात व दुर्गम भागातील शाळांवर पदस्थापना मिळाल्यामुळे १० ते १५ शिक्षक अद्यापही रुजू झालेले नाहीत. यापैकी काही शिक्षकांनी शिक्षण आयुक्तांना पदस्थापना बदलून मिळण्यासाठी विनंती केली. त्यानुसार शिक्षण आयुक्तांनी सदरील शिक्षकांची पदस्थापना बदलून देण्याचे आदेश एका पत्राद्वारे शिक्षण विभागाला दिले. सदरील पत्र काल शनिवारी शिक्षणाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले. तथापि, शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना शासनाने शुक्रवारीच बडतर्फ केले. त्यामुळे शिक्षण विभागातील कर्मचाºयांनी ते पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांना सादर केले. तेव्हा आर्दड यांनी सदरील शिक्षकांची पदस्थापना बदलून मिळणार नाही. यासंबंधी ग्रामविकास विभागाच्या सचिवांसोबत अगोदर चर्चा केल्यानंतरच निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड यांनी घेतली आहे. तथापि, सदरील पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाकडून परत शिक्षण विभागाकडे आले. त्या पत्राला तात्काळ उत्तर देण्याची सूचना शिक्षण आयुक्तांची होती. एक तर जि.प.मध्ये सध्या शिक्षणाधिकारी कार्यरत नाहीत.

Web Title:  Criterion of authority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.