आरोपीला मदत केल्याने फौजदार निलंबित
By Admin | Updated: June 25, 2014 01:06 IST2014-06-25T00:16:30+5:302014-06-25T01:06:23+5:30
जालना : घनसावंगी पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस उपनिरीक्षक साहेबराव गणपतराव थोरात यांना लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला मदत केल्याने निलंबित करण्यात आले.

आरोपीला मदत केल्याने फौजदार निलंबित
जालना : घनसावंगी पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस उपनिरीक्षक साहेबराव गणपतराव थोरात यांना लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला मदत केल्याने निलंबित करण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांनी केली.
वर्ष २०१४ मध्ये घनसावंगी पोलिस ठाण्यात बलात्कार आणि लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. थोरात यांनी ९० दिवसांच्या आत आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल करणे आवश्यक होते. थोरात यांनी जाणीवपूर्वक दिरंगाई करून विलंब केल्याने कालावधी उलटून गेल्यानंतर आरोपीला न्यायालयाने जामीन दिला. या प्रकरणात थोरात यांनी निष्काळजीपणा दाखविल्याने गंभीर गुन्ह्यात आरोपीला जामीन मिळाला.
ही वर्तणूक आरोपीला मदत करणारी ठरल्याने त्याची गंभीर दखल घेत थोरात यांना निलंबित करण्यात आले. (प्रतिनिधी)