दारूची चोरटी विक्री करणाऱ्यांविरूध्द गुन्हा
By Admin | Updated: December 31, 2016 23:48 IST2016-12-31T23:41:46+5:302016-12-31T23:48:22+5:30
जालना : विना परवाना मोटारसायकलवर देशी दारूची विक्री करताना आढळून आल्याची घटना शहरातील अष्टविनायकनगर येथे शनिवारी घडली

दारूची चोरटी विक्री करणाऱ्यांविरूध्द गुन्हा
जालना : विना परवाना मोटारसायकलवर देशी दारूची विक्री करताना आढळून आल्याची घटना शहरातील अष्टविनायकनगर येथे शनिवारी घडली. पोलीस उपनिरीक्षक वाघ यांच्या फिर्यादीवरून रमेश वाघमारे याच्याविरूध्द चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
किरकोळ कारणावरून मारहाण
घर रिकामे का करत नाही या कारणावरून मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवारी जालना तालुक्यातील माळेगाव येथे घडली. रूख्मीणबाई संतोष सांगळे यांच्या फिर्यादीवरून संतोष सांगळे आणि अन्य एका महिलेविरूध्द शनिवारी तालुका जालना गुन्हा दाखल करण्यात आला.
जीपच्या धडकेत एक जखमी
निष्काळजीपणे भरधाव जीपने धडक दिल्याने मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना परतूर तालुक्यातील आष्टी रेल्वे गेट जवळ घडली. गंगाराम साहेबराव बोरकर (रा. हाताडी) यांच्या फिर्यादीवरून गाडी (एम.एच.२१-३७७२) चालकाविरूध्द शनिवारी परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)