तोडफोड प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: August 9, 2014 00:33 IST2014-08-08T23:23:47+5:302014-08-09T00:33:41+5:30
गेवराई: येथील बसस्थानकातील नियंत्रण कक्षात जात दारुच्या नशेत तर्रर्र असणाऱ्या तीन प्रवाशांनी टेबल, खुर्ची, काचा फोडून नासधूस केल्याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात

तोडफोड प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा
गेवराई: येथील बसस्थानकातील नियंत्रण कक्षात जात दारुच्या नशेत तर्रर्र असणाऱ्या तीन प्रवाशांनी टेबल, खुर्ची, काचा फोडून नासधूस केल्याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबाद-परळी बस क्र. एमएच१४/बीटी१३७० या बसमध्ये देसमेसिंग हातमसिंग पोथीवाल, परविंदरसिंग, नरेंद्रसिंग निर्धा व सदवीरसिंग रणधीरसिंग गौड (सर्व रा.लुधियाना (पंजाब) ह.मु. औरंगाबाद या बसमध्ये शुक्रवारी दुपारी गेवराई स्थानकातून बसले. बसल्यानंतर त्यांनी गाडीतील वाहक आर.व्ही. क्षीरसागर यांच्याशी बसण्याच्या कारणावरुन हुज्जत घातली. वाद वाढत असल्याने वाहक नियंत्रण कक्षात त्यांची तक्रार देण्यासाठी गेले असता ते तिघे तेथे येऊन त्यांनी टेबल, खुर्चीची तोडफोड केली. याप्रकरणी त्या तिघांवर वाहक नियंत्रक भास्कर गिरे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा आहे. (वार्ताहर)