वीटभट्टीचालकांविरुद्धपोलिसांत गुन्हे दाखल
By Admin | Updated: May 24, 2014 00:42 IST2014-05-24T00:32:47+5:302014-05-24T00:42:11+5:30
पाथरी : शहरातील ६२ वीटभट्टीधारकांकडे ३१ मार्चअखेर १५ लाख रुपये गौण खनिजाची रक्कम येणे बाकी होते. रक्कम भरली नाही या कारणावरून सर्वच वीटभट्टी चालकांविरुद्ध गुन्हे

वीटभट्टीचालकांविरुद्धपोलिसांत गुन्हे दाखल
पाथरी : शहरातील ६२ वीटभट्टीधारकांकडे ३१ मार्चअखेर १५ लाख रुपये गौण खनिजाची रक्कम येणे बाकी होते. रक्कम भरली नाही या कारणावरून सर्वच वीटभट्टी चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिल्यानंतर २६ जणांविरुद्ध पाथरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पाथरी शहरात महसूल विभागाच्या सर्वेक्षणानुसार ६२ वीटभट्टींचे व्यवसाय चालू आहेत. यापूर्वी महसूल प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारे परवाना न घेता वीटभट्टी व्यवसाय चालत होता. तसेच यासाठी मोठ्या प्रमाणावर गौण खनिजाची चोरी करून वीटभट्टी व्यवसायासाठी वापरली जायची. जिल्हाधिकारी एस.पी. सिंह यांच्या आदेशानुसार पाथरी शहरातील वीटभट्टीचा व्यवसाय करणार्या वीटभट्ट्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणानंतर दुसर्या तालुक्याकडून फेरतपासणी करण्यात आली. ५०० रुपये परवाना फीस घेऊन ६२ वीटभट्टीधारकांना महसूल विभागाने परवाने दिले. ३१ मार्च २०१४ अखेर या सर्व वीटभट्टीधारकांकडे जवळपास १५ लाख रुपये गौण खनिजाची रक्कम येणे अपेक्षित होते. याबाबत संबंधितांना नोटिसाही देण्यात आल्या. तरीही गौण खनिजाची रक्कम भरण्यात न आल्यामुळे ६२ वीटभट्टीचालकांविरुद्ध पोलिस कारवाई करण्याबाबतचे आदेश दोन महिन्यांपूर्वी पाथरी तहसीलदारांनी मंडळ अधिकार्यांना दिले होते. त्यानंंतर ही कारवाई करण्यात आली. (वार्ताहर)दरम्यानच्या काळात याबाबत कारवाई न झाल्याने संबंधित मंडळ अधिकार्याच्या विरोधातच कारवाई करण्याबाबतचा अहवाल तहसीलदारांनी जिल्हाधिकार्यांना सादर केला होता. त्यानंतर मंडळ अधिकार्यांच्या फिर्यादीवरून २६ वीटभट्टीचालकांविरुद्ध पाथरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस प्रशासनाकडून स्वतंत्र वीटभट्टीचालकांविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल करण्याची माहिती तहसीलदार देवीदास गाडे यांनी दिली.