१९ लोटाबहाद्दरांवर मनपाकडून गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:25 IST2017-07-18T00:22:31+5:302017-07-18T00:25:22+5:30
परभणी : महानगरपालिकेने उघड्यावर शौचास जाणाऱ्या १९ नागरिकांवर गुन्हे दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

१९ लोटाबहाद्दरांवर मनपाकडून गुन्हे दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महानगरपालिकेने उघड्यावर शौचास जाणाऱ्या १९ नागरिकांवर गुन्हे दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. ही कारवाई १७ जुलै रोजी सकाळी ६ वाजता करण्यात आली. सलग दोन दिवसांपासून मनपाने केलेल्या कारवाईमुळे उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांचे धाबे दणाणले आहेत.
शहर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत गेल्या दोन दिवसांपासून शहरामध्ये १८८ मुंबई कलम गुन्हा अन्वये सार्वजनिक ठिकाणी घाण करणे या कायद्याखाली उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याची मोहीम राबविली जात आहे. यामध्ये मनपाच्या पथकाने १६ जुलै रोजी १४ नागरिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर दुसऱ्या दिवशी १७ जुलै रोजी जिंतूररोड परिसरातील भारतनगर, नेहरु नगर, शाहूनगर, फुलेनगर, संजय गांधी, भीमनगर, जुना पेडगावरोड येथे उघड्यावर शौचास जाणाऱ्या १९ नागरिकांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.
या मोहिमेत उपायुक्त विद्या गायकवाड, करण गायकवाड, राजू झोडपे, श्रीकांत खुरा, विकास रत्नपारखी, मेहराज अहेमद, माधव काकडे, लिंबाजी बनसोडे, प्रल्हाद देशमाने आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे.