मारहाण प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: April 23, 2015 00:45 IST2015-04-23T00:24:45+5:302015-04-23T00:45:43+5:30
शिराढोण : दगड उचलण्याच्या कारणावरून एकास मारहाण झाल्याची घटना कळंब तालुक्यातील माळकरंजा येथे २८ मार्च रोजी घडली होती. याप्रकरणी बुधवारी तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारहाण प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा
शिराढोण : दगड उचलण्याच्या कारणावरून एकास मारहाण झाल्याची घटना कळंब तालुक्यातील माळकरंजा येथे २८ मार्च रोजी घडली होती. याप्रकरणी बुधवारी तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, माळकरंजा येथील सनदकुमार आडसूळ हे २८ मार्च रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शेतात गेले होते. यावेळी दगड उचलण्याच्या कारणावरून लोमटे कुटुंबातील लोकांनी त्यांच्यासोबत वाद घातला. तसेच शिवीगाळ करीत लाथा-बुक्क्या व लोखंडी गजाने मारहाण केली. यात आडसूळ यांचा हात फ्रॅक्चर झाला. त्यांना उपचारासाठी उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, रुग्णालयातून घरी आल्यानंतर सनदकुमार आडसूळ यांनी २२ एप्रिल रोजी शिराढोण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यावरून विशाल चंद्रकांत लोमटे, चंद्रकांत कृष्णाजी लोमटे, उज्वला चंद्रकांत लोमटे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना भाऊसाहेब जगताप व बाबासाहेब मोराळे करीत आहेत. (वार्ताहर)