आंदोलनकर्त्यांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:20 IST2021-02-05T04:20:57+5:302021-02-05T04:20:57+5:30
संदीप शिरसाठ, डॉ. जमिल देशमुख, अमित भुईगळ, अफसर पठाण, हाफिज इक्बाल अन्सारी, शेख मुस्ताक यांच्यासह आंदोलकांचा आरोपींमध्ये समावेश ...

आंदोलनकर्त्यांविरुद्ध गुन्हा
संदीप शिरसाठ, डॉ. जमिल देशमुख, अमित भुईगळ, अफसर पठाण, हाफिज इक्बाल अन्सारी, शेख मुस्ताक यांच्यासह आंदोलकांचा आरोपींमध्ये समावेश आहे.
================
.....
दारु पाजण्यास विरोध केल्याने ब्लेडने वार
औरंगाबाद: दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मित्रानेच मित्रावर ब्लेडने वार करून त्याला जखमी केल्याची घटना २४ जानेवारी रोजी सायंकाळी अशोकनगरातील मनपा शाळेजवळ घडली.
सतीश भास्कर दीपकर (वय ३०, रा. अशोकनगर, चिकलठाणा) हे रविवारी सायंकाळी अशोकनगर येथील मनपा शाळेजवळून जात असताना आरोपी मनोज पट्टेकर, सुमित ऊर्फ सुंबा पट्टेकर आणि सुरज रमेश शिंदे यांनी दीपकरला आवाज देवून बोलावून घेतले. त्यांनी दीपकरला दारूसाठी पैशांची मागणी केली. दीपकर यांनी दारू पाजण्यास नकार दिल्याने आरोपी मनोजने उजव्या गालावर ब्लेडने वार केला. तसेच सुमित याने शिवीगाळ व बेल्टने मारहाण केली. रमेशने जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर मनोजने सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
======================
फळविक्रेत्याला मारहाण
औरंगाबाद: फळविक्रीचे दुकान लावण्यावरून तीन जणांनी जीवे मारण्याची धमकी देत फळविक्रेत्याला काठी आणि चापटाने बेदम मारहाण केली. ही घटना २६ जानेवारी रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास चिश्तिया चौक ते कॅनॉट प्लेस रस्त्यावर घडली.
फळविक्रेता शाहेद खान जाहेद खान (वय ३१, रा. रहेमानिया कॉलनी) यांनी सिडको ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला. शेख पाशा पटेल (रा. सईदा कॉलनी), सोनू (रा. शहाबाजार) आणि जावेद (रा. रहेमानिया कॉलनी)अशी आरोपींची नावे आहेत.