क्राईम सिंगल न्यूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:28 IST2020-11-12T07:28:15+5:302020-11-12T07:28:15+5:30

औरंगाबाद : सातारा परिसरातील भाग्योदयनगर येथे उभी असलेली मोटरसायकल २ नोव्हेंबर रोजी सकाळी चोरट्यांनी पळविली. प्रदीप विष्णुकांत येडे यांनी ...

Crime Single News | क्राईम सिंगल न्यूज

क्राईम सिंगल न्यूज

औरंगाबाद : सातारा परिसरातील भाग्योदयनगर येथे उभी असलेली मोटरसायकल २ नोव्हेंबर रोजी सकाळी चोरट्यांनी पळविली. प्रदीप विष्णुकांत येडे यांनी सातारा ठाण्यात तक्रार नोंदविली.

=============

तीन लाखांसाठी विवाहितेचा छळ

औरंगाबाद : ट्रक खरेदी करण्यासाठी माहेराहून ३ लाख रुपये आणावेत याकरिता विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला. पती राज लक्ष्मण मोरे, सासरे लक्ष्मण रामभाऊ मोरे आणि तीन महिलांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

============

चोरट्यांनी पळविले चंदनाचे झाड

औरंगाबाद : जिल्हा उद्योजकता विकास केंद्राच्या आवारातील चंदनाचे झाड चोरट्यांनी तोडून नेले. १ नोव्हेंबर रोजी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी नीलेश देवीदास लहाने यांनी वेदांतनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.

=======

विवाहितेचा छळप्रकरणी गुन्हा

औरंगाबाद : घरखर्चासाठी माहेराहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याच्या आरोपावरून वेदांतनगर पोलिसांनी पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला. पती सागर संजय आव्हाड, सासरा संजय कचरू आव्हाड आणि सासू यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

Web Title: Crime Single News