अवैध वाळू वाहतुकीच्या सात वाहनांवर गुन्हे
By Admin | Updated: May 26, 2015 00:45 IST2015-05-26T00:06:55+5:302015-05-26T00:45:46+5:30
बदनापूर : पोलीस ठाण्याअंतर्गत अवैध वाळू वाहतुकीची वाहतूक करणाऱ्या सात वाहनांवर एकूण सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहे. वाळू व वाहनांसह एकुण १ कोटी २० लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे

अवैध वाळू वाहतुकीच्या सात वाहनांवर गुन्हे
बदनापूर : पोलीस ठाण्याअंतर्गत अवैध वाळू वाहतुकीची वाहतूक करणाऱ्या सात वाहनांवर एकूण सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहे. वाळू व वाहनांसह एकुण १ कोटी २० लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे
बदनापूरच्या परीक्षाविधीन पोलीस अधिकारी तथा सहायक जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ प्रियंका नारनवरे यांनी अवैध गौणखनीजाची वाहतूक करणा-या वाळू माफियांविरूध्द मोहीम उघडली. जालना-औरंगाबाद रोड, राजुर -दाभाडी रोड ,चनेगाव शिवार अशा विविध ठिकाणी वाळूने भरलेली सात व्हायवा टिप्पर पकडण्यात आली याप्रकरणी आज दि २५ मे रोजी पोउपनि चैनसिंग सांडुसिंग गुसिंगे, पोहेकॉ सुभाष प्रतापराव चव्हाण,शेख इब्राहिम शेख महेबुब, नितीन शामुअल ढिल्पे, देवीदास काशीनाथ राठोड,अनिल शामराव चव्हाण आदिंच्या फिर्यादीवरून व्हायवा टिप्पर क्र एम एच - २० सीटी ९६२५ ,एम एच - २० सीटी ४२५ ,एम एच - २० डिई ३११५एम एच - २० डिई ४२५ , एम एच - एवाय १४१६ ,एम एच - २० बीटी ४२८९ ,एम एच - २१ वाय ५३३३ या वाहनांवर अवैधरित्या गौणखनिजची वाहतुक व शासनाची रॉयल्टी भरली नसल्याच्या आरोपावरून वाहनचालकांवर वेगवेगळे सहा गुन्हे दाखल करण्यात आले असुन पुढील तपास पोहेकॉ कसबे हे करीत आहेत यामधे प्रत्येक वाहन व त्यामधील वाळु असा एकुण प्रत्येकी २० लाखा चा ऐवज जप्त केला असुन याची एकुण किंमत एक कोटी ४० लाख रूपये आहे या मोठया कार्यवाहीमुळे वाळुमाफियांमधे खळबळ माजली आहे. (वार्ताहर)