तिसगावात दोघाजणांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा

By | Updated: December 2, 2020 04:08 IST2020-12-02T04:08:33+5:302020-12-02T04:08:33+5:30

तिसगावात दोघाजणांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा औरंगाबाद : तिसगाव परिसरातील दोघाजणांविरुद्ध छावणी पोलिसांनी वीज चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. कार्यकारी ...

Crime of power theft against two persons in Tisgaon | तिसगावात दोघाजणांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा

तिसगावात दोघाजणांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा

तिसगावात दोघाजणांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा

औरंगाबाद : तिसगाव परिसरातील दोघाजणांविरुद्ध छावणी पोलिसांनी वीज चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. कार्यकारी अभियंता राजेंद्र हिरालाल राजपूत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रावसाहेब राधाकृष्ण सातपुते हे तिसगाव येथे ग्रोथ सेंटर नावाचे दुकान चालवितात. त्यांनी दोन मागील वर्षांत ४९२८ युनिटची वीज चोरी करुन महावितरण कंपनीचे ८१ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान केले आहे, तर व राजेंद्र रामकृष्ण दौंड यांनीही दोन वर्षांत ४२५८ युनिटची वीज चोरी केली असून त्यांनी ५४ हजार ४५० रुपयांचे महावितरणचे आर्थिक नुकसान केले आहे. याप्रकरणी सहाय्यक फौजदार वारे हे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Crime of power theft against two persons in Tisgaon