विवाहितेचा छळ केल्याचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:21 IST2020-12-11T04:21:19+5:302020-12-11T04:21:19+5:30

============ संजयनगर येथे दुचाकी चोरी औरंगाबाद संजयनगर येथे घरासमोर उभी करून ठेवलेली मोटरसायकल चोरट्यांनी लंपास केली. २८ नोव्हेंबर ...

Crime of marital harassment | विवाहितेचा छळ केल्याचा गुन्हा

विवाहितेचा छळ केल्याचा गुन्हा

============

संजयनगर येथे दुचाकी चोरी

औरंगाबाद संजयनगर येथे घरासमोर उभी करून ठेवलेली मोटरसायकल चोरट्यांनी लंपास केली. २८ नोव्हेंबर रोजी रात्री झालेल्या या चोरीप्रकरणी सिकंदर खान यासीन खान यांनी जिन्सी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

===========

४४ हजार ८८५ रुपयांचा गुटखा जप्त

औरंगाबाद : चोरट्या मार्गाने विक्री करण्यासाठी आणलेला ४४ हजार ८८५ रुपयांचा सुगंधी तंबाखू आणि गुटखा एमआयडीसी सिडको पोलिसांनी ९ डिसेंबर रोजी सकाळी जप्त केला. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी सुलक्षणा जाधवर यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात आरोपी सय्यद फझल सय्यद कदीर (३६, रा. मुजीब कॉलनी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.

==============

समर्थनगरातून दुचाकी पळविली

औरंगाबाद : उभी करून ठेवलेली दुवाकी (एमएच २० ईएक्स ३०४२) चोरट्यांनी ६ डिसेंबर रोजी सकाळी चोरून नेली. याविषयी बबू कासम बागवान यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

Web Title: Crime of marital harassment