शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात गावाला गेलेल्या कुटुंबाचे घर टार्गेट; उस्मानपुऱ्यात ४८ तासांत तीन घरफोड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 13:00 IST

लॅच लॉक तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी; रहिवाशांमध्ये भीतीचे सावट

छत्रपती संभाजीनगर : कौटुंबिक कामानिमित्त पुण्याला गेलेल्या कुटुंबाच्या घराचे लॅच लॉक तोडून चोरांनी तीन तोळे सोन्याच्या दागिन्यांसह चांदी व रोख रक्कम लंपास केली. १८ मार्चला उघडकीस आलेल्या घरफोडीप्रकरणी १९ मार्चला उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सेवानिवृत्त किरण बालाजी कुलकर्णी हे कुटुंबासह उस्मानपुऱ्यातील कासलीवाल रेसिडेन्सीमध्ये राहतात. ९ मार्चला सकाळी ६ वाजता ते पत्नीसह पुण्यात राहणाऱ्या मुलाला भेटण्यासाठी गेले होते. १८ मार्चला सकाळी ११ वाजता शहरात परतल्यानंतर त्यांच्या मुख्य दरवाजाचे लॅच लॉक तुटलेले दिसले. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त फेकलेले होते. बेडरूममधील कपाट फोडून चोरांनी १ तोळ्याचे मंगळसूत्र, १ तोळ्याचे कानातले, सुमारे ३० ते ४० हजार रुपयांचे चांदीचे साहित्य, सोन्याचे २ ग्रॅमचे मणी, चांदीचे १ तोळ्याचे पायातील जोडवे, बँक लॉकरच्या चाव्या, हातातील घड्याळ व १० हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संग्राम ताटे यांनी घटनास्थळाची पाहणी करून याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

दर्शन करून परतेपर्यंत चोरांनी दोन फ्लॅट फोडलेउस्मानपुऱ्यातीलच श्रेयनगरमध्ये एकाच अपार्टमेंटमधील दोन फ्लॅट तासाभरात फोडून चोरांनी ८० हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. सुरेश खडके (७१) हे व त्यांचे भाऊ एकाच इमारतीत राहतात. १९ मार्चला सायंकाळी ६ वाजता ते व त्यांच्या भावाचे कुटुंब गुढीपाडव्याच्या निमित्ताने राममंदिरात दर्शनासाठी गेले होते. सायंकाळी ७ वाजता घरी परतल्यावर मात्र दोघांच्या फ्लॅटच्या दरवाजाचा कडी-कोंडा तोडून चोरांनी घरात प्रवेश केल्याचे निष्पन्न झाले. घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकून देत त्यांनी एकूण ८० हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याचे खडके यांनी तक्रारीत म्हटले आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Chhatrapati Sambhajinagar: Homes targeted; burglaries spike in Osmanpura within 48 hours.

Web Summary : Thieves targeted a family's home in Chhatrapati Sambhajinagar, stealing gold, silver, and cash. In Osmanpura, two flats were burgled while residents visited a temple, with ₹80,000 stolen. Police are investigating all incidents.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर