छत्रपती कारखाना उपाध्यक्षावर धमकावल्या प्रकरणी गुन्हा
By Admin | Updated: November 19, 2015 00:25 IST2015-11-18T23:48:41+5:302015-11-19T00:25:28+5:30
माजलगाव : तालुक्यातील सावरगाव येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मोहन बाजीराव जगताप व त्यांच्या साथीदाराने युवक काँग्रेसचे

छत्रपती कारखाना उपाध्यक्षावर धमकावल्या प्रकरणी गुन्हा
माजलगाव : तालुक्यातील सावरगाव येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मोहन बाजीराव जगताप व त्यांच्या साथीदाराने युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विनायक वचिष्ठ शिंदे यांना धमकावल्या प्रकरणी ग्रामीण ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस तथा लवुळ येथील रहिवासी विनायक शिंदे यांनी मोहन जगताप यांच्या तालुक्यातील जलयुक्त शिवार, विनापरवाना खडी क्रशर, विनापरवाना वाळु साठा, आरक्षित जागेवर अतिक्रमण केल्या प्रकरणी तक्रारी केल्या होत्या. या सर्व तक्रारी परत घे म्हणून १७ नोव्हेंबर रोजी मोहन जगताप यांचा कार्यकर्ता वसंत अलकुंटे यानी फोनवर शिवीगाळ करून धमकाविले होते. या प्रकरणी विनायक शिंदे यांनी पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्याकडे तक्रार केली होती. तक्रारीची दखल घेत माजलगाव ग्रामीण ठाण्यात मोहन जगताप व त्यांचे साथीदार वसंत अलकुंटे याच्या विरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)