आता कॅरिबॅग उत्पादकांवरच गुन्हे
By Admin | Updated: December 15, 2015 00:04 IST2015-12-14T23:53:04+5:302015-12-15T00:04:27+5:30
औरंगाबाद : शहरात आणि राज्यात पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅग वापरावर बंदी आहे. तरीही या कॅरिबॅगचा वापर सर्रास सुरू आहे.

आता कॅरिबॅग उत्पादकांवरच गुन्हे
औरंगाबाद : शहरात आणि राज्यात पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅग वापरावर बंदी आहे. तरीही या कॅरिबॅगचा वापर सर्रास सुरू आहे. त्यामुळे मनपाने आता त्याच्या मुळावरच घाव घालण्याचा निर्णय घेतला आहे. बंदी असलेल्या कॅरिबॅगचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची यादी आपल्याला मिळाली आहे. आता त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्यासाठी लवकरच ती यादी आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे देणार आहोत, अशी माहिती मनपाचे प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सोमवारी सर्वसाधारण सभेत दिली.
मनपा प्रशासनाने कचरा संकलनासाठी नवीन वाहने खरेदी करण्याचा प्रस्ताव सभेत मंजुरीस्तव ठेवला होता. तो चर्चेला येताच नगरसेवक कचऱ्याच्या विषयावर तुटून पडले. नगरसेवकांनी मनपा प्रशासन शहर स्वच्छ ठेवण्यात नापास असल्याचा आरोप केला. मनपाने नवीन वाहने जरूर घ्यावीत, पण आहे त्या मनुष्यबळाचा आणि वाहनांचाही नीट वापर करण्यावर लक्ष द्यावे, अशी सूचना नगरसेवकांनी केली. मीना गायके, शिल्पाराणी, सुनीता आऊलवार, ज्योती पिंजरकर, रावसाहेब आमले, माधुरी अदवंत, ए. टी. के. शेख, कैलास गायकवाड, विकास जैन, नंदकुमार घोडेले, भाऊसाहेब जगताप यांच्यासह सर्वच नगरसेवकांनी कचरा व्यवस्थितीत उचलला जात नसल्याची तक्रार केली. तब्बल दोन तास चर्चा झाल्यानंतर आयुक्त केंद्रेकर म्हणाले, शहर कचरामुक्त करण्यासाठी विविध पातळ्यांवर काम सुरू आहे. मुळात कचराच कमी निर्माण व्हावा असा प्रयत्न आहे. हे काम तात्काळ होणारे नाही तर ही लंबी लढाई आहे. लोकांना शिस्त लावावी लागेल, वेळप्रसंगी शिक्षा करावी लागेल. कचरा उचलून समस्या सुटणार नाही. नारेगाव किती ओझे सहन करणार आहे. कचरा डेपोसाठी दुसरी जागा मिळणे अवघड आहे. त्यामुळे कचरा कमी करण्यालाच प्राधान्य द्यावे लागेल. बांधकाम परवानगी देताना ओल्या कचऱ्याची कंपोस्ट प्रकल्प उभारून घरीच विल्हेवाट लावणे बंधनकारक करण्याची अट टाकण्याची सूचना नगररचना विभागाला केली आहे. कॅरिबॅग विक्रेत्यांची बैठक घेऊन त्यांनाही तंबी दिली आहे. पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅगचा साठा