गुन्हे शाखेचे पथक मुंबई- पुण्याला रवाना

By Admin | Updated: July 31, 2014 01:25 IST2014-07-31T01:00:36+5:302014-07-31T01:25:44+5:30

औरंगाबाद : अनेकांना गंडा घालणाऱ्या केबीसी व सुपर पॉवरच्या आरोपीच्या शोधात गुन्हे शाखेचे विशेष पथक मुंबई, पुण्याकडे रवाना झाले

Crime Branch to Mumbai- Pune | गुन्हे शाखेचे पथक मुंबई- पुण्याला रवाना

गुन्हे शाखेचे पथक मुंबई- पुण्याला रवाना

औरंगाबाद : अनेकांना गंडा घालणाऱ्या केबीसी व सुपर पॉवरच्या आरोपीच्या शोधात गुन्हे शाखेचे विशेष पथक मुंबई, पुण्याकडे रवाना झाले असून, केबीसीच्या मूळ तक्रारी नाशिकला असल्याने औरंगाबादेत दाखल तक्रारी वर्ग करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले.
गंडा घालणाऱ्यांविषयीचा पर्दाफाश होताच. तक्रारींचा पाऊस आयुक्तालयात सुरू झाला अन् पोलीस यंत्रणाही सपाटून कामाला लागली. तक्रारी दाखल होताच आरोपींनी शहर सोडून पलायन केले असून, औरंगाबाद गुन्हे शाखेची विशेष पथके मुंबई व पुण्यासाठी रवाना झाले आहेत.
केबीसी तक्रारीसंदर्भात नाशिक पोलिसांसोबत नुकतेच बोलणे झाले असून, मूळ तक्रार ही नाशिकला असल्याने येथील गुन्हे वर्ग केले जाणार आहेत. केबीसी व सुपर पॉवर या दोन्ही गुन्ह्यांचा तपास एकत्रच करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Web Title: Crime Branch to Mumbai- Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.