पाच जणांविरूद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा
By Admin | Updated: October 30, 2014 00:27 IST2014-10-30T00:18:54+5:302014-10-30T00:27:11+5:30
ढोकी : ‘तुम्ही आमच्यावर केस का केली’, असे म्हणत शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरूध्द ढोकी पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाच जणांविरूद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा
ढोकी : ‘तुम्ही आमच्यावर केस का केली’, असे म्हणत शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरूध्द ढोकी पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना तालुक्यातील खामगाव येथे बुधवारी सकाळी घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी सकाळी ९ ते १० वाजेच्या सुमारास खामगाव येथील अक्षय प्रकाश पौळ हे त्यांच्या घरी असताना रामराजे प्रदीप शिनगारे यांच्यासह इतर चौघे तेथे आले. त्यांनी पौळ यांच्यासह त्यांचे आई-वडील, आजी-आजोबा व बहीण यांना ‘तुम्ही आमच्यावर केस का केली?’, अशी विचारणा करीत शिवीगाळ व मारहाण केली. यात हे सर्वजण जखमी झाले.
याप्रकरणी पोलिसांनी अक्षय पौळ यांचा उस्मानाबाद येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असताना जबाब घेतला. या जबाबावरून रामराजे शिनगारे याच्यासह अमित प्रदीप शिनगारे, अजीत तानाजी शिनगारे, रविकांत विक्रम शिनगारे व जयदीप ऊर्फ अमर चंद्रकांत शिनगारे यांच्याविरूध्द अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी ढवळे करीत आहेत. (वार्ताहर)