आठ जणांविरुद्ध ‘अॅट्रॉसिटी’चा गुन्हा
By Admin | Updated: September 13, 2014 23:46 IST2014-09-13T23:46:19+5:302014-09-13T23:46:19+5:30
नवीन नांदेड : मोटारसायकल न दिल्याचा राग मनात ठेवून अनुसूचित जातीमधील २३ वर्षीय तरूणास जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आठ जणांविरुद्ध ‘अॅट्रॉसिटी’चा गुन्हा
नवीन नांदेड : मोटारसायकल न दिल्याचा राग मनात ठेवून अनुसूचित जातीमधील २३ वर्षीय तरूणास जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याच्या आरोपावरून नांदेड ग्रामीण ठाण्यात आठ आरोपींविरूद्ध ‘अॅट्रॉसिटी’चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील सुधाकर लिंगायत (रा. पावडेवाडी ता. नांदेड) असे फिर्यादीचे नाव आहे. सुनील लिंगायत हे पिंपळगाव पुंड येथे मामाच्या गावी गेले होते. यावेळी पंढरी डक याने दुचाकी मागितली, ती न दिल्याने आरोपी पापाराव दशरथ डक, शंकर विश्वनाथ डक, ज्ञानेश्वर संतुकराव डक, राजू रमेशराव डक, चांदू व्यंकटी डक, हनुमंत दशरथ डक, बंडू मधुकर पुंड व पंढरी नागोराव डक या आठ आरोपींनी ८ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास लिंगायत यांच्या मामाच्या घरासमोर गैरकायद्याची मंडळी जमविली. यावेळी त्यांनी सुनील लिंगायत यांना जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण केल्याचा आरोप आहे. लिंगायत यांनी आरडाओरड केल्यानंतर भांडण सोडविण्याकरीता त्यांची मामी कोंडाबाई जोगदंड आणि अन्य साक्षीदार आले असता, आरोंपीेनी त्यांना शिवीगाळ करून जीेवे मारण्याची धमकी दिली. याशिवाय मामी कोंडाबाई जोगदंड यांनासुद्धा मारहाण केली. याप्रकरणी लिंगायत यांनी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला असून सहा. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख तपास करीत आहेत.(वार्ताहर)