दुचाकीस्वारावर गुन्हा
By Admin | Updated: October 7, 2014 00:13 IST2014-10-07T00:01:43+5:302014-10-07T00:13:00+5:30
हिंगोली : समोरून येणाऱ्या दुचाकीस धडक देऊन दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकीचालकावर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

दुचाकीस्वारावर गुन्हा
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथे रिसोड रस्त्यावर वाहन भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवून समोरून येणाऱ्या दुचाकीस धडक देऊन दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकीचालकावर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
५ आॅक्टोबर रोजी सायंकाळी सेनगाव ते रिसोड जाणाऱ्या राज्य रस्ता क्रमांक २०६ वर एकनाथ विश्वनाथ मुकीर (रा. सावरखेडा, ता.सेनगाव) याने त्याच्या ताब्यातील दुचाकी क्रमांक एम. एच. ३८- ४८२४ ही भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवून समोरून येणाऱ्या अमजदखाँ यांच्या दुचाकीस जोराची धडक दिली. या अपघातात अमजदखाँ व त्यांच्यासोबतचे रेहान खाँ, आयान खाँ, साईना हे गंभीर जखमी झाले.
यातील आयान खाँ, अमजद खाँ हे जागीच मरण पावले. यात दोघांच्या मरणास कारणीभूत ठरून एकनाथ मुकीर हा स्वत: जखमी होऊन मरण पावला, अशी फिर्याद मो. मोहसीन मो. कुरेशी (२८, रा. चिंचबा, ता. रिसोड) यांनी पोलिसांत दिली. त्यावरून सेनगाव पोलीस ठाण्यात मयत दुचाकीविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)