दोन तोतया पोलिसांवर गुन्हा

By Admin | Updated: July 16, 2014 01:26 IST2014-07-16T00:28:45+5:302014-07-16T01:26:01+5:30

उस्मानाबाद : पोलिस भरती करतो म्हणून आळणी येथील युवकाकडून १ लाख, १८ हजार रूपये घेत फसवणूक केल्याप्रकरणी दोघाविरूध्द उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Crime against two detective policemen | दोन तोतया पोलिसांवर गुन्हा

दोन तोतया पोलिसांवर गुन्हा

उस्मानाबाद : पोलिस भरती करतो म्हणून आळणी येथील युवकाकडून १ लाख, १८ हजार रूपये घेत फसवणूक केल्याप्रकरणी दोघाविरूध्द उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना १५ मे ते १४ जुलै दरम्यान घडली़ अटकेतील एकास न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे़
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, आळणी येथील सुरज महादेव माळी (वय-२५) यांचा भाऊ पवन महादेव माळी यास पोलिस भरती करतो, असे म्हणत योगेश रामभाऊ काळे (वय-२५), कपिल बापूराव वाघमारे (दोघे रा़येरमाळा) यांनी माळी याच्याकडून १ लाख, १८ हजार रूपये घेतले़ काळे व वाघमारे हे दोघे पोलिस दलात कार्यरत नसताना विनापरवाना पोलिसांचा गणवेश परिधान करून फिरत होते़ पोलिस भरती झाल्यानंतर व येरमाळा येथील प्रकरणानंतर सुरज माळी यांना ते दोघे पोलिस नसल्याची माहिती मिळाली़ त्यानंतर त्यांनी उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली़ या फिर्यादीवरून योगेश काळे व कपिल वाघमारे या दोघाविरूध्द ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि ए़जी़परदेशी हे करीत आहेत़ या प्रकरणातील योगेश काळे यास अटक केली आहे़ काळे यास न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे़ (प्रतिनिधी)
१०४०० रुपये जप्त
गुन्हा दाखल झाल्यानंतर सपोनि ए़ जी़ परदेशी यांनी या प्रकरणातील योगेश रामभाऊ काळे यास अटक केली आहे़ त्याच्याकडून १०४०० रूपये जप्त करण्यात आले आहेत़ तर दुसरा आरोपी कपिल बापूराव वाघमारे हा फरार आहे़ काळे याला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे़
दुसरा गुन्हा
पोलिस भरतीचे अमिष दाखवून दोघा युवकांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघाविरूध्द येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ आळणी येथील युवकांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले आरोपहीही त्या प्रकरणात आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले़

Web Title: Crime against two detective policemen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.