मंडळ अधिकाऱ्यासह दहा जणांविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: September 24, 2014 00:16 IST2014-09-24T00:09:00+5:302014-09-24T00:16:43+5:30
नांदेड : पतीला मृत दाखवून त्यांचे नावे असलेली गॅच्युईटी व सेवानिृवत्तीची रक्कम उचलल्याप्रकरणी पत्नीसह अन्य नऊ जणांविरुद्ध वजिराबाद ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला

मंडळ अधिकाऱ्यासह दहा जणांविरुद्ध गुन्हा
नांदेड : जिल्हा परिषदेच्या शाळेवर सहशिक्षक असलेल्या पतीला मृत दाखवून त्यांचे नावे असलेली गॅच्युईटी व सेवानिृवत्तीची रक्कम उचलल्याप्रकरणी पत्नीसह अन्य नऊ जणांविरुद्ध वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
पांडुरंग विठ्ठलराव बिरादार सहशिक्षक बोरगाव ता़ उदगीर यांनी पत्नी जयश्री पांडुरंग बिरादार हिने संगनमत करुन ते मृत झाल्याचे कागदोपत्री दाखविले़ त्यानंतर भानुदास बळीराम काळे, नागनाथ भानुदास काळे, प्रदीपकुमार ढगे, जयमाला प्रदीप ढगे, तहसीलदार कराळे, पंढरीनाथ विठ्ठलराव पांचाळ, मंडळ अधिकारी यु़ डी़ बिरादार, अव्वल कारकुन स्वामी व डॉ़अशोक शिंदे यांच्या मदतीने त्यासंबंधीचे खोटे कागदपत्रे तयार करुन शिक्षण विभागात दाखल केले़ त्यानंतर पांडुरंग बिरादार यांच्या सेवानिवृत्तीची व ग्रॅच्युईटीची रक्कम उचलून शासनाची फसवणुक केली़ याप्रकरणी पांडुरंग बिरादार यांनी वजिराबाद पोलिस ठाण्यात तक्रार दिली़ तपास पोउपनि भालेराव करीत आहेत़ (प्रतिनिधी)