लाच प्रकरणी तलाठी खोतकरविरुध्द गुन्हा
By Admin | Updated: May 8, 2014 23:35 IST2014-05-08T23:34:06+5:302014-05-08T23:35:45+5:30
जालना : लाठी किसन खोतकर यांनी ७ हजार रूपयाची लाच मागितल्याचे निषपन्न झाल्याने त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाच प्रकरणी तलाठी खोतकरविरुध्द गुन्हा
जालना : तालुक्यातील नंदापूर सज्जाचे येथील तलाठी किसन खोतकर यांनी ७ हजार रूपयाची लाच मागितल्याचे निषपन्न झाल्याने गुरूवारी त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदापूर येथील शेतकरी वैजिनाथ नारायण उबाळे यांच्या आजोबाच्या नावावर असलेली गट नं.२०६ मधील ४२ आर जमीन वडिलांच्या नावावर करायची होती. त्यासाठी ते तलाठी खोतकर यांना भेटले होते. मागील चार - पाच महिन्यापूर्वी हे प्रकरण थांबलेले होते. यासाठी खोतकर यांनी आजोबाचे मृत्यूचे प्रमाणपत्र व इतर वारसांना समोर आणून नमुना नं.९ वर सही करण्यासाठी घेऊन यावे लागेल असे सांगितले. आजोबाचा मृत्यू दाखला तसेच वडिलांच्या नावावर जमीन करण्याबाबत कागदपत्रे तीन आठवड्यापूर्वीच तलाठ्यांकडे सादर केले होते. तसेच वडील नारायण उबाळे व चुलते देवीदास, रमेश उबाळे या सर्वांना तलाठी खोतकर यांच्या शिवाजीपुतळा परिसरात येथील कार्यालयात नेले होते. त्यांच्याशी तलाठ्यांनी विचारपूस केली. सदरील जमीन वारसांने मयत झालेले यादवराव उबाळे यांच्या नावावर होती ती जमीन वैजिनाथ उबाळे यांच्या नावावर करण्यासाठी कुठलीही हरकत नसल्याचे त्यांच्या चुलत्यांनी सांगितले होते. त्यावरून तलाठी खोतकर यांनी उबाळे यांचे वडील आणि चुलते यांची कागदपत्रावर सही घेतली व १५ दिवसांनी या असे सांगितले. त्यानंतर १५ एप्रिल रोजी दुपारी तलाठी खोतकर यांनी या कामासाठी खर्च येईल काम फुकट होणार नाही असे सांगितले. त्यावर ७ हजार रूपये देण्याची तडजोड झाली. परंतू उबाळे यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात जाऊन खोतकर यांच्याविरूद्ध तक्रार दिली. या तक्रारीची पडताळणी या विभागाने केली. त्यावरून ३० एप्रिल रोजी तलाठी खोतकर यांच्या कार्यालयात सापळा आयोजित केला होता. मात्र त्यादिवशी तलाठी खोतकर यांनी भेटण्यास नकार दिला. दरम्यान तलाठी खोतकर यांनी लाचेची मागणी निष्पन्न झाले. त्यांच्याविरूध्द गुरूवारी सदर बाजार पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी) एसीबीची कारवाई सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक संजय बाविस्कर, अप्पर पोलिस अधीक्षक बी.बी.पिंगट, यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक एच.व्ही.गिरमे, पोलिस निरीक्षक व्ही.बी. चिंचोले, पोलिस निरीक्षक एस.एम.मेहेत्रे, अशोक पाटील, संतोष धायडे, नंदू शेंडीवाले, प्रदीप दौंडे, अमोल आगलावे, संजय उदगीरकर, प्रदीप उबाळे, रामचंद्र कुदर, संदीप लव्हारे, गंभीर पाटील, रमेश चव्हाण, महेश सोनवणे चालक संजय राजपूत यांनी पार पाडली.