सैन्यभरतीसाठी बनावट जन्मप्रमाणपत्र सादर करणाऱ्या सहा तरुणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:19 IST2021-02-05T04:19:58+5:302021-02-05T04:19:58+5:30

विजय नामदेव मनगटे (रा. वाकड, ता. कन्नड), शंकर सुरेश वाघ, महाबळेश्वर पुंडलिकराव केंद्रे (रा. दैठणा, ता. कंधार, जि. नांदेड), ...

Crime against six youths for submitting fake birth certificates for recruitment | सैन्यभरतीसाठी बनावट जन्मप्रमाणपत्र सादर करणाऱ्या सहा तरुणांवर गुन्हा

सैन्यभरतीसाठी बनावट जन्मप्रमाणपत्र सादर करणाऱ्या सहा तरुणांवर गुन्हा

विजय नामदेव मनगटे (रा. वाकड, ता. कन्नड), शंकर सुरेश वाघ, महाबळेश्वर पुंडलिकराव केंद्रे (रा. दैठणा, ता. कंधार, जि. नांदेड), प्रशांत रामचंद्र महाले (रा. दुसाने, सिक्री), किरण कौतिकराव भाडगे (रा. वाकड) आणि अनिस अलाउद्दीन शेख (रा. माळी गल्ली, परभणी) अशी आरोपी तरुणाची नावे आहेत.

याविषयी प्राप्त माहिती अशी की, दरवर्षी सैन्य भरती कार्यालयाकडून सैन्य भरतीचे आयोजन केले जाते. देशसेवा आणि शासकीय नोकरी मिळण्याचे हमखास ठिकाण म्हणून लाखो तरुण सैन्यात दाखल होण्यासाठी प्रयत्न करतात. सैन्य दलात भरती होण्यासाठी वयाची अट आहे. वयोमर्यादा संपल्यावर सैन्य दलात दाखल होता येत नाही. सैन्य भरतीचे स्वप्न भंगू नये याकरिता तरुण त्यांच्या जन्मतारखेत परस्पर बदल करतात आणि वयोमर्यादा संपल्यानंतरही भरतीप्रक्रियेत सहभागी होतात. त्यांच्यापैकीच आरोपी तरुणांचा समावेश आहे. आरोपी तरुणांनी २०१६ ते २०२० या कालावधीत छावणीतील भारतीय सैन्य दलात भरतीसाठी लेखी आणि मैदानी चाचणी दिली होती. यात हे तरुण भरतीसाठी पात्र ठरल्यानंतर सैन्य अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार त्यांनी त्यांची शैक्षणिक कागदपत्रे सादर केली. या कागदपत्राची अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता या तरुणांनी सादर केलेल्या जन्मतारखेच्या दाखल्यातील जन्मतारीख बनावट असल्याचे दिसून आले. जन्मतारखेत फेरफार करून ते असली असल्याचे भासवून ते त्यांनी सादर केल्याचे स्पष्ट झाले. हा प्रकार समोर आल्यावर छावणी येथील सैन्य भरती अधिकारी कर्नल तरुणसिंग भगवानसिंग जमवाल (४०) यांनी याविषयी सोमवारी छावणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करीत आहेत.

==============

चौकट

आरोपींंना नोटीस देऊन बोलावणार

आरोपी वेगवेगळ्या ठिकाणचे रहिवासी आहेत. त्यांना नोटीस पाठवून हजर राहण्याचे निर्देश दिले जाईल. यानंतरही ते जर हजर झाले नाही तर त्यांना त्यांच्या गावी जाऊन अटक केली जाणार असल्याचे छावणी पोलिसांनी सांगितले.

Web Title: Crime against six youths for submitting fake birth certificates for recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.