छळ प्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा
By Admin | Updated: March 27, 2016 00:11 IST2016-03-27T00:11:41+5:302016-03-27T00:11:41+5:30
लातूर : शहरातील शास्त्री नगरात राहणाऱ्या एका विवाहितेचा वाहन खरेदीसाठी माहेरहून एक लाख घेवून ये म्हणून मानसिक व शारीरिक छळ करुन मारहाण केल्याची घटना घडली असून,

छळ प्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा
लातूर : शहरातील शास्त्री नगरात राहणाऱ्या एका विवाहितेचा वाहन खरेदीसाठी माहेरहून एक लाख घेवून ये म्हणून मानसिक व शारीरिक छळ करुन मारहाण केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी सासरच्या सात जणांविरोधात गांधी चौक पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूर शहरातील शास्त्री नगरात राहणारी विवाहिता सिमरण पठाण (२६) यांचा सासरच्या मंडळीकडून लग्न झाल्यापासून सतत मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. विवाहितेस माहेरहून छोटा हत्ती वाहन खरेदीसाठी एक लाख रुपये घेवून ये म्हणून छळ करण्यात आला. विवाहिता सिमरणच्या माहेरची परिस्थिती हालाखीची असल्याने हा प्रकार तिने माहेरच्या मंडळींना सांगितला नाही. अखेर सातत्याने होणारा छळ सहन न झाल्याने माहेरच्या मंडळींना याबाबतची कल्पना सिमरणने दिली.
शिवाय अनेकदा उपाशीपोटी ठेवून लाथाबुक्क्यांनी मारहाण आणि शिवीगाळ केल्याची तक्रारही विवाहितेने आपल्या फिर्यादीत केली आहे. या प्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन सासरच्या हाजीखॉ पाशा पठाण याच्यासह अन्य सहा जणांविरोधात कलम ४९८ (अ), ३२३,
५०४, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा
दाखल करण्यात आला
आहे. (प्रतिनिधी)