पोलीस निरीक्षक भुमे यांच्याविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: March 10, 2017 00:27 IST2017-03-10T00:24:30+5:302017-03-10T00:27:10+5:30
लातूर : वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गोवर्धन भुमे यांनी बुधवारी अॅपेरिक्षा चालकास शिवीगाळ करून मारहाण केल्याच्या कारणावरून गुन्हा नोंद आहे़

पोलीस निरीक्षक भुमे यांच्याविरुद्ध गुन्हा
लातूर : वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गोवर्धन भुमे यांनी बुधवारी दुपारी लातूर शहरातील कव्हा रोडवरील शिवनेरी गेटसमोर अॅपेरिक्षा चालकास शिवीगाळ करून मारहाण केल्याच्या कारणावरून गांधी चौक पोलिसांत गुन्हा नोंद आहे़ दरम्यान, पोलीस निरीक्षक भुमे यांच्या फिर्यादीवरून अॅपे चालकाविरूद्ध गुन्हा नोंद झाला होता़
चाकूर तालुक्यातील घाटोळा येथील ज्ञानेश्वर धोंडीराम जाधव अॅपेरिक्षा घेऊन येत असताना ८ मार्च रोजी दुपारच्या सुमारास कव्हा रोड येथील शिवनेरी गेटसमोर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गोवर्धन भुमे यांनी रिक्षा बाजूला घेण्यास सांगितले़ रोडवर रिक्षा का थांबविलास म्हणून रिक्षाचालक जाधव यांना पोलीस निरीक्षक भुमे यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली़ तसेच रिक्षात बसलेल्या ज्ञानेश्वर यांच्या वडिलासही मारहाण करण्यात आली, असे गांधी चौक पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत ज्ञानेश्वर जाधव यांनी म्हटले आहे़
त्यानुसार वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भुमे यांच्याविरूद्ध कलम ३२३, ५२४, ४२७ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास एपीआय हाके करीत आहेत़