दुसरे लग्न करणाऱ्या पोलीस हवालदाराविरुद्ध गुन्हा

By | Updated: December 3, 2020 04:09 IST2020-12-03T04:09:17+5:302020-12-03T04:09:17+5:30

पोलीस हवालदार दीपक शेनफड भाले, त्याचे वडील शेनफड भाले, भाऊ अनिल भाले, मेहुणा नितीन जगधने आणि तीन महिलांचा आरोपींमध्ये ...

Crime against a police constable who married another | दुसरे लग्न करणाऱ्या पोलीस हवालदाराविरुद्ध गुन्हा

दुसरे लग्न करणाऱ्या पोलीस हवालदाराविरुद्ध गुन्हा

पोलीस हवालदार दीपक शेनफड भाले, त्याचे वडील शेनफड भाले, भाऊ अनिल भाले, मेहुणा नितीन जगधने आणि तीन महिलांचा आरोपींमध्ये समावेश आहे. याविषयी पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार महिला आणि आरोपी ग्रामीण पोलीस दलात हवालदार आहेत. किरकोळ कारणावरून पती-पत्नीत वाद झाल्यावर आरोपी तिला दीपकचे दुसरे लग्न लावून देण्याची भाषा वापरत आणि त्याच्या पाठिंब्यावर आरोपी दीपकने १९ वर्षीय तरुणीसोबत दुसरा विवाह केला. ही बाब समजताच भाले यांच्या पहिल्या पत्नीने पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध तक्रार नोंदविली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितले.

Web Title: Crime against a police constable who married another