फसवणूकप्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: March 23, 2016 01:06 IST2016-03-23T00:51:52+5:302016-03-23T01:06:33+5:30
उस्मानाबाद : तालुक्यातील लासोना येथील आदित्य आर्थिक नियोजन मल्टिस्टेटच्या स्थानिक समिती अध्यक्ष, सचिवासह नऊ जणाविरुद्ध बेंबळी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

फसवणूकप्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा
उस्मानाबाद : तालुक्यातील लासोना येथील आदित्य आर्थिक नियोजन मल्टिस्टेटच्या स्थानिक समिती अध्यक्ष, सचिवासह नऊ जणाविरुद्ध बेंबळी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन मंगळवारी न्यायालयात हजर असता न्यायालयाने २५ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील आदित्य आर्थिक नियोजन मल्टिस्टेट को आॅफ बँक लिमिटेड या बँकेची लासोना येथे शाखा सुरू करण्यात आली होती़ या शाखेच्या स्थानिक समितीवर लासोना येथील काही पदाधिकारी यांची निवड केली होती़ त्यांच्यावर विश्वास ठेऊन बऱ्याच लोकांनी शाखेत सोनेतारण ठेऊन थोडेफार कर्ज घेतलेले होते़ कर्जाच्या रक्कमेचा परत भरणाही केला होता़ मात्र तारण ठेवलेले सोने परत मिळाले नाही. काही खातेदारांनी बँकेत पैसे जमा ठेवले होते़ मात्र, ही शाखा बंद करून हणमंत सुरेश कदम (रा़लासोना) यांचे व इतर लोकांचे जवळपास २ लाख ६९ हजार १७५ रूपयांची फसवणूक केली़ याबाबत हणमंत कदम यांच्या फिर्यादीवरून समिती पदाधिकाऱ्यांसह ९ जणांविरुद्ध बेंबळी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलिसांनी या प्रकरणात लासोन्याचे उपसरपंच तथा स्थानिक कमिटीचे अध्यक्ष संगमेश्वर शिवलिंग स्वामी, सचिव राजेश माधव सुतार, रोखपाल गुणवंत रामकिसन नागटिळे यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनाविण्यात आली़ अधिक तपास सपोनि एऩएम़दंडे हे करीत आहेत़ (प्रतिनिधी)