विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा\

By Admin | Updated: March 26, 2016 23:56 IST2016-03-26T23:56:52+5:302016-03-26T23:56:52+5:30

औरंगाबाद : सासरी होत असलेला छळ आणि पतीचे अनैतिक संबंध असल्यामुळे एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी हिनानगर भागात घडली.

The crime against the marriage of five people: | विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा\

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा\


औरंगाबाद : सासरी होत असलेला छळ आणि पतीचे अनैतिक संबंध असल्यामुळे एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी हिनानगर भागात घडली. या प्रकरणी शनिवारी (दि.२६) पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.
शिवानंद जाधव (पती), प्रल्हाद जाधव (सासरा), भिकाबाई जाधव (सासू), गजानन जाधव (दीर) आणि अनिता जाधव (जाऊ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. राधा शिवानंद जाधव, असे मृत विवाहितेचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राधाची आई सुमनाबाई धनसिंग कासोदे (रा. मुंडवाडी, ता. कन्नड, ह.मु. वाळूज पंढरपूर) यांनी फिर्याद दिली आहे. राधाचा २०१० मध्ये शिवानंद याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर सासरच्यांनी काही दिवस चांगले वागविले. मात्र, नंतर त्यांनी क्षुल्लक कारणावरून मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच पती शिवानंद याचेही अनैतिक संबंध असल्याची माहिती राधाला मिळाली. यामुळे राधाचा सासरच्या मंडळींनी प्रचंड त्रास दिला. त्यांच्या त्रासाला वैतागून तिने शुक्रवारी घरी हिनानगर येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
शनिवारी मृत राधाच्या आईने पोलिसांत तक्रार दिल्यामुळे सासरच्या पाच जणांविरुद्ध मरणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी फौजदार सरला गाडेकर यांनी गुन्हा दाखल करून घेतला. या प्रकरणाचा तपास फौजदार विष्णू तांदळे करीत आहेत. आरोपी पती शिवानंद जाधव याला अटक करण्यात आली आहे.

Web Title: The crime against the marriage of five people:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.