लाच मागणाऱ्या तलाठ्याविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: July 8, 2014 01:05 IST2014-07-08T00:45:38+5:302014-07-08T01:05:49+5:30
औरंगाबाद : फेर घेण्यासाठी एका शेतकऱ्याकडून चार हजार रुपयांची लाच मागणारा पैठण तालुक्यातील थेरगाव येथील तलाठी रवींद्र गोविंदराव मोखाडे याच्याविरुद्ध पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

लाच मागणाऱ्या तलाठ्याविरुद्ध गुन्हा
औरंगाबाद : फेर घेण्यासाठी एका शेतकऱ्याकडून चार हजार रुपयांची लाच मागणारा पैठण तालुक्यातील थेरगाव येथील तलाठी रवींद्र गोविंदराव मोखाडे याच्याविरुद्ध पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या कारवाईबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, थेरगाव येथे फिर्यादीच्या वडिलांच्या नावे चार एकर दोन आर जमीन आहे. वडिलांच्या निधनामुळे वारसाहक्काने ही जमीन आपल्या व भावाच्या नावे करून द्यावी, यासाठी फिर्यादी हे तलाठी रवींद्र मोखाडेला भेटले. तेव्हा त्याने हे काम करून देण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली.
लाच देण्याची इच्छा नसल्याने फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्या तक्रारीवरून लाचलुचपतच्या पोलिसांनी दोन पंच फिर्यादीसोबत पाठविले.
या पंचासह फिर्यादी हे तलाठ्याला भेटले. तेव्हा त्याने काम करण्यासाठी पुन्हा चार हजार रुपयांची मागणी केली. तलाठ्याने लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सोमवारी अखेर तलाठ्याविरुद्ध पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.