पाणलोट समिती सचिवासह कृषी पर्यवेक्षकाविरूध्द गुन्हा
By Admin | Updated: March 11, 2017 23:41 IST2017-03-11T23:40:11+5:302017-03-11T23:41:51+5:30
तामलवाडी :३९ लाख १३ हजार ६९ रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी पाणलोटच्या समिती सचिवासह कृषी पर्यवेक्षकाविरूध्द तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

पाणलोट समिती सचिवासह कृषी पर्यवेक्षकाविरूध्द गुन्हा
तामलवाडी : एकात्मिक पाणलपोट समितीमार्फत कामाच्या मोबदल्याची बिले शासनाची फसवणूक करून नियमबायह्य पध्दतीने वाटप करीत ३९ लाख १३ हजार ६९ रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी पाणलोटच्या समिती सचिवासह कृषी पर्यवेक्षकाविरूध्द तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना १ एप्रिल २०१३ ते ३१ मे २०१३ या कालावधीत खडकी शिवारात घडली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यातील खडकी शिवारात एकात्मिक पाणलोट समितीच्या वतीने विविध कामे करण्यात आली आहेत़ खडकी येथील पाणलोट समितीचे सचिव मिथुन बद्रीनाथ राठोड व अणदूर येथील कृषी पर्यवेक्षक हणमंत शंकरराव गायकवाड यांनी १ एप्रिल २०१३ ते ३१ मे २०१३ या कालावधीत समितीमार्फत झालेल्या कामाचा मोबदला म्हणून संगणमताने काम करणाऱ्या मशीन धारकांना ३९ लाख १३ हजार ६९ रूपयांचा निधी वाटप केला़ चौकशी नंतर ही पाणलोट समिती नियमाबह्य असून, शासकीय निकषाप्रमाणे स्थापन झालेली नसल्याचे दिसून आले़ या समितीच्या सचिव व कृषी पर्यवेक्षकानी शासनाची फसवणूक करीत शासन निधीचा अपहार केल्याचे उपविभागीय कृषी अधिकारी उमेश बाबुराव बिराजदार यांनी तामलवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे़ या फिर्यादीवरून खडकी येथील पाणलोट समितीचे सचिव मिथुन बद्रीनाथ राठोड, कृषी पर्यवेक्षक हणमंत शंकरराव गायकवाड यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि बेग हे करीत आहेत़