शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पतसंस्थेने केला परस्पर कोट्यवधींचा व्यवहार, इंकम टॅक्सने खातेदारास लावला ७७ लाखाचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 14:12 IST

पतसंस्थेने खातेदाराच्या खात्यावरून केला परस्पर कोट्यवधींचा व्यवहार

पैठण : पतसंस्थेने खातेदाराच्या खात्यावरून परस्पर कोट्यवधींचे व्यवहार केल्याने ७७ लाख रुपये दंड भरण्याची खातेदारास आयकर विभागाने नोटीस पाठविली. अन् या धक्कादायक प्रकाराने खातेदाराच्या पायाखालची जमीनच सरकली. चौकशी केल्यानंतर न्याय मिळविण्यासाठी त्याने दोन वर्षे लढा दिला. परंतु कोणीच ऐकत नव्हते. शेवटी न्यायालयात धाव घेतल्याने अन्यायाला वाचा फुटली.

याबाबत न्यायालयाने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देताच रेणुकामाता मल्टिस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. या पतसंस्थेच्या पदाधिकारी व पैठण शाखेतील कर्मचाऱ्यांविरोधात शनिवारी रात्री उशीरा पैठण पोलिसात गुन्हा दाखल झाला. पैठण येथील विजय रामलाल सुते (४६) यांनी टाटा टेलिकॉमचे डिस्ट्रिब्युटर म्हणून काम करत असताना रेणुकामाता मल्टी क्रेडिट सोसायटीत करंट खाते उघडले होते. दोन वर्षांपासून व्यवसाय बदलल्याने सुते यांच्या खात्यावरील व्यवहार बंद होते. परंतु गेल्या वर्षी त्यांना आयकर विभागाची ७७ लाख रुपये दंड भरण्याची नोटीस आली आणि ते हादरलेच. त्यांनी थेट पतसंस्था गाठून विचारणा केली असता पतसंस्थेचे बिंग फुटले. सदरचा गैरप्रकार लक्षात आल्यानंतर विजय सुते यांनी व्यवस्थापकांशी चर्चा केली. त्यांनी पतसंस्थेच्या अहमदनगर येथील मुख्य शाखेत जाण्याचा सल्ला दिला. 

तेथे अध्यक्ष व सचिवांना भेटून घडलेला प्रकार सुते यांनी सांगितला. परंतु सर्वांनी हात वर केले. पतसंस्थेवर गुन्हा दाखल करावा म्हणून ठाणेदारापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत अर्ज केले. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. शेवटी पैठण न्यायालयात सुते यांनी दाद मागितली. न्यायालयाने संबंधितांवर गुन्हा दाखल केला.

यांच्यावर झाला गुन्हा दाखलप्रशांत चंद्रकांत भालेराव (अध्यक्ष, रेणुकामाता मल्टिस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. अहमदनगर) यांच्यासह पतसंस्थेचे सचिव व व्यवस्थापक. पैठण शाखेतील रोखपाल ललिता शिवाजी चौधरी, हरिश्चंद्र मोरे व दिनेश टकले यांच्याविरोधात पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्या खात्यावर रक्कम पाठविली त्यांना मिळालीच नाहीखातेदार विजय सुते यांच्या खात्यावरून आरोपींनी विविध लोकांशी आरटीजीएस, नेटफंड ट्रान्सफर अकाऊंट क्लोज, लोन अगेन्स्ट फिक्स डिपॉझिट, सोने तारण कर्ज इत्यादी नोंदी एनएसबीआय, रेक्टीफाय इंट्री, मर्चंट बँक ट्रान्सफर दाखविले आहे. परंतु संबंधित खातेदारांच्या खात्यावर एक रुपयाची नोंद नाही. त्यामुळे पतसंस्थेने या आर्थिक व्यवहारात मोठी अफरातफर केल्याचे उघड झाले आहे. यात हवाला रक्कम वळतीचा संशय व्यक्त केला जात आहे.

हे प्रकरणी घडले तेव्हा मी येथे नव्हतो. अर्जदाराने अर्ज केल्यानंतर त्यांचे रेकाॅर्ड तपासले असता ते अहमदनगरच्या मुख्य शाखेत असल्याचे पुढे आले. त्यानुसार आम्ही त्यांना कळवले होते.- प्रसाद कचरे, शाखा व्यवस्थापक

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद