माझ्या यशाचं श्रेय सोनू सूदला - अमित साध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:04 IST2020-12-29T04:04:51+5:302020-12-29T04:04:51+5:30

सोनू सूदने केवळ गरिबांनाच नव्हे तर काही सेलिब्रिटींना देखील मदत केली आहे. यापैकी एक सेलिब्रिटी म्हणजे अमित साध. ‘सुलतान’, ...

The credit for my success goes to Sonu Sood - Amit Sadh | माझ्या यशाचं श्रेय सोनू सूदला - अमित साध

माझ्या यशाचं श्रेय सोनू सूदला - अमित साध

सोनू सूदने केवळ गरिबांनाच नव्हे तर काही सेलिब्रिटींना देखील मदत केली आहे. यापैकी एक सेलिब्रिटी म्हणजे अमित साध. ‘सुलतान’, ‘काय पो छे’, ‘रेस ३’ यांसारख्या अनेक बिग बजेट चित्रपटांमध्ये झळकलेल्या अमितला सोनू सूदमुळे पहिला ब्रेक मिळाला होता. “सोनूमुळेच मला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. आज मी जे काही यश मिळवलं त्याचं श्रेय मी सोनूला देतो. आज त्याच्या दानशूरपणाची सर्वत्र स्तुती होत आहे; परंतु खरं सांगायचं झालं तर तो गेली कित्येक वर्षे लोकांची मदत करतोय.” अशा आशयाचं ट्वीट करून अमितने सोनू सूदचे आभार मानले. त्याचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

शाहीर शेख पत्नीसह करतोय भूतानची सफर

‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ फेम शाहीर शेख सध्या पत्नी रुचिका कपूरसह हनीमून एन्जॉय करत आहे. शाहीरने लग्नाचा गाजावाजा न करता कोर्ट मॅरेज करत त्याच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली. हनीमूनसाठी दोघांनी भूतानची निवड केली असून, निसर्गाच्या सानिध्यात ते क्वॉलिटी टाईम स्पेंड करत आहेत. त्याने नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला असून, पत्नीसोबत तो निवांत क्षण एन्जॉय करताना पाहायला मिळतोय. शाहीर आणि रुचिका दोघेही पूर्वीपासून एकमेकांना ओळखत होते. यामुळेच शाहीरने सांगितले होते की, आम्ही लग्नबंधनात अडकले असलो तरी पती-पत्नी नंतर, याआधी आम्ही दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहोत.

Web Title: The credit for my success goes to Sonu Sood - Amit Sadh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.