क्रेडाईने केले रक्ताचे नाते घट्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:02 IST2021-07-18T04:02:57+5:302021-07-18T04:02:57+5:30

चौकट रक्तदानात महिलांचाही सहभाग क्रेडाई वूमन विंगने या रक्तदान शिबिराच्या आयोजनात हिरीरीने सहभाग नोंदवून रक्तदानही केले. शिबिराच्या ...

Credai tightened the blood relationship | क्रेडाईने केले रक्ताचे नाते घट्ट

क्रेडाईने केले रक्ताचे नाते घट्ट

चौकट

रक्तदानात महिलांचाही सहभाग

क्रेडाई वूमन विंगने या रक्तदान शिबिराच्या आयोजनात हिरीरीने सहभाग नोंदवून रक्तदानही केले. शिबिराच्या सहसंयोजक सीए श्वेता भारतीया, तसेच वैशाली चौधरी, दीपा पटारे, कविता तौर, किरण काळे, अंजली गजमल, शिल्पा बगडिया, चरणजित कौर, प्रतीक्षा खैरनार, उषा नागपाल यांच्यासह अन्य महिलांनी रक्तदान करून रक्तदानात आपला टक्का वाढविला.

चौकट

एका रक्तदानातून चार जणांना जीवदान

‘लोकमत’च्या ‘रक्ताचे नाते’ या राज्यव्यापी रक्तदान मोहिमेत क्रेडाईने आपला खारीचा वाटा उचलला, याचा मला अभिमान आहे. आज शेकडो दात्यांनी रक्तदान करून आपले कर्तव्य पार पाडले. एका रक्ताच्या पिशवीतून चार जणांना जीवदान देता येते. या महानरक्तदानात योगदान दिल्याबद्दल सर्वांचे आभार.

-नरेंद्रसिंग जबिंदा,

महाराष्ट्र क्रेडाईचे सहसचिव, माजी अध्यक्ष औरंगाबाद क्रेडाई

Web Title: Credai tightened the blood relationship