शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
3
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
4
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
5
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
6
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
7
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
8
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
9
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
10
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
11
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
12
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
13
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
14
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
15
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
16
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
17
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
18
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
19
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

भंगारातून नवसाहित्याची निर्मिती !

By admin | Updated: July 21, 2014 00:22 IST

लातूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयाने जुन्याला नवा आकार देऊन नवसाहित्य निर्माण केले आहे. यातून लाखो रुपयांची बचत झाली आहे.

लातूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयाने जुन्याला नवा आकार देऊन नवसाहित्य निर्माण केले आहे. यातून लाखो रुपयांची बचत झाली आहे.रुग्णालयातील लोखंडी पलंग, स्ट्रेचर ट्रॉली, बेडसाईड लॉकर आदी साहित्य मोठ्या प्रमाणात नादुरुस्त होते. ते भंगारजमा होते. गेल्या आठ वर्षांपासून हे साहित्य वापराविना पडून होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. दीप्ति डोणगावकर यांनी या संदर्भात समिती स्थापन करून भंगार साहित्याचे सॉर्टिंग केले. त्यातील लोखंडी पलंग, स्ट्रेचर ट्रॉली, साईड लॉकर साहित्य बाजूला काढले. त्याची दुरुस्ती करून नवा आकार दिल्यास पुनर्वापर होऊ शकतो, असे समितीचेही मत तयार झाले. त्यामुळे अधिष्ठातांनी भंगारातून टिकाऊ साहित्य बनविण्याचा उपक्रम हाती घेतला आणि त्याची निविदा काढून प्रस्तुत साहित्य बनविण्याचे काम देण्यात आले. २९ स्ट्रेचर ट्रॉली, १०० बेडसाईड लॉकर, १०० लोखंडी पलंग, ४८ लोखंडी खुर्च्या या भंगारातून तयार करण्यात आल्या आहेत. स्ट्रेचरसाठी प्रतिनग ६९२९ रुपये असा नव्यासाठी खर्च होतो. एकूण २ लाख ७६७ रुपये स्ट्रेचरसाठी खर्च करावा लागला असता. तर १०० कॉटसाठी ९ लाख ८० हजार रुपये आणि बेडसाईड लॉकरसाठी २ लाख ५६ हजार रुपये आणि लोखंडी खुर्च्यासाठी ९६ हजार रुपये असा एकूण १५ लाख ३२ हजार ७६७ रुपये खर्च झाला असता. परंतु, प्रशासनाने जुन्याला नवा आकार देऊन या खर्चाची बचत केली.टाकाऊपासून टिकावू...‘टाकाऊपासून टिकावू वस्तू’ महाविद्यालय प्रशासनाने एक वेगळा पॅटर्न निर्माण केला आहे. नव्या साहित्याची मागणी केल्यानंतर त्याची प्रक्रिया किचकट असते. ते वेळेतही मिळत नाही. त्यामुळे समस्या वाढत जाते. त्यामुळे अधिष्ठातांनी पलंग, खुर्च्या, टेबल, स्ट्रेचर या वस्तू भंगारातून तयार केल्या. त्याचे कौतुक होत आहे.अन्य साहित्यांचा पुनर्वापर...अन्य भंगार साहित्यातून अनेक नव्या गोष्टी तयार करण्यात आल्या आहेत. औषधी खोक्यासाठी आलेल्या पॅकिंगच्या लाकडी फळ्यांचा नेमप्लेटसाठी वापर करण्यात आला आहे. शिवाय, औषध विभागाला गोळ्या वितरणासाठी ट्रे बनविण्यात आले आहेत. अधिष्ठातांच्या या उपक्रमाला महाविद्यालयातील डॉ. डोपे, डॉ. कोकणे, डॉ. कांचन भोरगे, डॉ. गोरे, डॉ. अनमोड, हरिश पिंपळकर यांनी साथ दिली आणि हे नवे साहित्य आकाराला आले.