शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

समांतरचे नवीन डिझाईन तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 23:20 IST

समांतर जलवाहिनी योजनेचे डिझाईन मनपाने तब्बल १२ वर्षांपूर्वी तयार केले होते. २०२५ मध्ये शहराची संभाव्य लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून ही योजना तयार केली होती. शहर झपाट्याने वाढत आहे. सातारा-देवळाईसारखा महत्त्वाचा भागही आता मनपा हद्दीत समाविष्ट करण्यात आला आहे.

ठळक मुद्देविभागीय आयुक्त : पाणी प्रश्नावर भाजप नगरसेवकांनी घेतली भेट

औरंगाबाद : समांतर जलवाहिनी योजनेचे डिझाईन मनपाने तब्बल १२ वर्षांपूर्वी तयार केले होते. २०२५ मध्ये शहराची संभाव्य लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून ही योजना तयार केली होती. शहर झपाट्याने वाढत आहे. सातारा-देवळाईसारखा महत्त्वाचा भागही आता मनपा हद्दीत समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे संभाव्य समांतर जलवाहिनी योजनेचे नवीन डिझाईन तयार करा, असे आदेश आज विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मनपाला दिले.शहराचा पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. सिडको-हडकोसह जालना रोडवरील अनेक वॉर्डांना आठ ते दहा दिवसांनंतर पाणीपुरवठा होत आहे. उन्हाळा सुरू झाल्यापासून आजपर्यंत महापालिकेला पाण्याचे नियोजन करता आले नाही. त्यामुळे आज भाजपा नगसेवकांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची भेट घेतली. आयुक्तांनी प्रथम कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांच्याशी फोनवर संपर्क साधून समांतरची सद्य:स्थिती जाणून घेतली. त्यानंतर विधि सल्लागार अपर्णा थेटे यांच्याकडून कादेशीर माहिती घेतली. नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसेकर यांच्यासोबतही समांतर जलवाहिनीसंदर्भात सविस्तर चर्चा केली. म्हैसेकर यांनी नमूद केले की, मुळात ही योजना १२ वर्षांपूर्वी तयार केली होती. योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत तिचा कार्यकाल संपणार आहे. त्यामुळे जुनी योजना आज राबवून काहीच उपयोग होणार नाही. महापालिकेलाही यापूर्वी नवीन डिझाईन तयार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. शासनाकडे नवीन योजनेचा प्रस्ताव पाठविल्यास त्यात काहीतरी मार्ग काढता येईल. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य जलवाहिनी तरी टाकता येईल. या कामासाठी स्वतंत्र टेंडर काढता येऊ शकते का, याची चाचपणी करण्यात येईल. सातारा-देवळाईसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविणे अशक्य आहे. नवीन योजनेत सातारा देवळाईसह २०४५ किंवा २०४० ची लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून प्रकल्प राबवावा लागेल, असेही त्यांनी नमूद केले.केंद्रेकर यांनी मनपा अधिकाऱ्यांना नवीन योजनेचे डिझाईन तयार करण्याचे आदेश दिले. यावेळी उपमहापौर विजय औताडे, माजी महापौर बापू घडमोडे, प्रमोद राठोड, दामूअण्णा शिंदे, मनोज गांगवे, माधुरी अदवंत आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी